
IND vs SA: India's shortcomings exposed with a crushing defeat! Is coach Gambhir's stubbornness behind the victory or captain Gill's arbitrariness?
हेही वाचा : IND W vs BAN W : भारतीय महिला संघाच्या डिसेंबर २०२५ च्या मालिकेत मोठा बदल! संपूर्ण दौरा आता अनिश्चित अवस्थेत
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ईडन गार्डन्स कसोटीत घेण्यात आलेले निर्णय आश्चर्यकारक होते. तिसऱ्या क्रमांकावर नियमित खेळणाऱ्या साई सुदर्शनला वगळण्यात आले आणि वॉशिंग्टन सुंदरला पाठवण्यात आले. सुंदर सहसा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करतो, म्हणून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा त्याचा निर्णय पहिल्याच चेंडूपासून चुकीचा ठरल्याचे दिसून आले. सुंदर फलंदाजी करू शकत नव्हता आणि गोलंदाजीत देखील त्याला काही योगदान देण्याची संधी देण्यात आली नाही.
गौतम गंभीरसाठी ही सवय नवीन नाही. प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून त्याने टी-२० संघात अनेक बदल केल्याचे दिसून आले. अभिषेक शर्माला सलामीवीर म्हणून आणण्यात आले आणि संजू सॅमसनसोबत त्याला सलामीला पाठवण्यात आले होते. जी सुरुवातीच्या सामन्यांमध्ये बरीच यशस्वी ठरली होती. परंतु, आशिया कपच्या अगदी आधी शुभमन गिलला सलामीवीर म्हणून पाठवण्यात आले, तर संजूला पाचव्या क्रमांकावर ढकलले होते. ज्याचा संघाला चांगलाच फटका बसला. सलामीच्या स्थानात करण्यात आलेल्या बदलाचा थेट परिणाम संपूर्ण मधल्या फळीवर झाला आणि संघ अनेक सामन्यांमध्ये संतुलन बिघडल्याचे दिसून आले.
सूर्यकुमार यादवचा टी-२० स्वरूपातील त्याचे विक्रम दर्शवितात कि, तो तिसऱ्या क्रमांकावर सर्वात यशस्वी ठरतो. असे असून देखील, त्याला वारंवार चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर पाठवण्यात आले आहे. यामुळे त्याचा नैसर्गिक आक्रमक खेळ दबला गेला आणि त्याचा फॉर्म देखील खराब झाल्याचे दिसले. त्याचप्रमाणे, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत देखील शिवम दुबेच्या आधी हर्षित राणाला पाठवले गेले. जे संघासाठी चांगलेच महागात पडले. गेल्या काही महिन्यांत फलंदाजीचा क्रम अनेक वेळा बदलला गेल्याने संघाची स्थिरता त्यामुळे धोक्यात आली आहे.
हेही वाचा : IND vs SA: प्रशिक्षक गंभीरने आखला चक्रव्युह! ‘या’ अस्त्राच्या मदतीने दक्षिण आफ्रिकेची फिरकी भिंत भेदणार
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर, भारताने साई सुदर्शनला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरवले. त्याने या स्थानावर काही महत्त्वाच्या खेळी साकारल्या आहेत. परंतु, दक्षिण आफ्रिका कसोटीच्या अगदी आधी त्याला वगळण्यात आले आणि सुंदरला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याची जोखीम घेण्यात आली होती आणि त्याचा संघाला चांगलाच फटका बसला.