
GG vs UPW, WPL 2026 LIVE: UP Warriors win the toss and elect to bowl! GG will bat.
GG vs UPW, WPL 2026 LIVE : आज गुरुवारी महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये १४ व्या सामन्यात युपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स आमनेसामने आले आहेत. हा सामना नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी युपी वॉरियर्स संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा करण्याचा निर्णय घेतला आहे. तर गुजरात जायंट्स संघ प्रथम फलंदाजी करणार आहे.
ॲशले गार्डनरच्या गुजरात संघाने चालू हंगामात आतापर्यंत ५ सामने खेळले असून त्यातील २ सामन्यात विजय मिळवता आलेला आहे. त्यामुळे गुजरात संघ आजचा सामना जिंकून गुणतालिकेत सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. तर यूपी वॉरियर्झ संघाने देखील ५ सामने खेळून २ सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे यूपी देखील हा सामना आपल्या नवे करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
यूपीडब्ल्यूची कर्णधार मेग लॅनिंगने टॉस जिंकल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “आम्ही गोलंदाजी करणार आहोत. जर आम्ही सुरुवातीलाच जीजीवर काही दबाव टाकू शकलो. दव पडायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा सरावाला सुरुवात केली आहे. परिस्थितीचा अंदाज घेणे खूप महत्त्वाचे आहे. कदाचित नवी मुंबईइतकी उसळी येथे नाही. आमचा संघ तोच आहे”
टॉस गमावणारी जीजी कर्णधार ॲश गार्डनर म्हणाली की, “आम्हालाही गोलंदाजी करायची होती. आशा आहे की आम्ही येथे सुरुवातीलाच चांगली सुरुवात करू. तुम्हाला कदाचित जास्त वेळ सरळ गोलंदाजी करावी लागेल. ते सोपे वाटते. आमच्या निर्णय प्रक्रियेत अचूक राहण्याचा प्रयत्न करू. आम्ही फलंदाजीने सुरुवातीलाच चांगली सुरुवात करू शकतो, ही एक सकारात्मक गोष्ट आहे. जॉर्जिया वेअरहॅमच्या जागी डॅनी व्याट संघात आली आहे.”
हेही वाचा : Ranji Trophy 2026 : सरफराज खानचे निवडकर्त्यांना ‘शतकी’उत्तर! रणजी ट्रॉफीमध्ये तळपली बॅट; वाचा सविस्तर
गुजरात जायंट्स महिला प्लेइंग इलेव्हन: बेथ मुनी (यष्टीरक्षक), सोफी डिव्हाईन, अनुष्का शर्मा, डॅनी व्याट-हॉज, कनिका आहुजा, ॲशले गार्डनर (कर्णधार), काश्वी गौतम, भारती फुलमाळी, तनुजा कंवर, रेणुका सिंग ठाकूर, हॅपी कुमारी
यूपी वॉरियर्झ महिला प्लेइंग इलेव्हन : मेग लॅनिंग (कर्णधार), किरण नवगिरे, फोबी लिचफिल्ड, हरलीन देओल, क्लो ट्रायॉन, श्वेता सेहरावत (यष्टीरक्षक), सोफी एक्लेस्टोन, दीप्ती शर्मा, आशा शोभना जॉय, शिखा पांडे, क्रांती गौड