Glenn Maxwell: Glenn Maxwell sets an embarrassing record in IPL 2025, overtaking Rohit Sharma...
Glenn Maxwell : आयपीएल 2025 अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे. या मोसमात आतापर्यंत एकूण पाच सामने खेळले गेले आहेत. पाचवा सामना काल(दि. 25 मार्च) पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात पंजाब किंग्सने गुजरात जायंट्सचा 11 धावांच्या फरकाने पराभव केला. आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीच्या जोरावर युवा खेळाडूंनी जगभरात आपले नाव कमावले आहे. तर दुसरीकडे असे काही खेळाडू आहेत ज्यांच्या नावावर यावर्षी काही लाजिरवाण्या विक्रमांची नोंद झाली आहे. यामध्ये पंजाब किंग्जचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेलचा समावेश आहे.
आयपीएलच्या बाबतीत ग्लेन मॅक्सवेलचे नशीब बलवत्तर मानले जाते. कारण तो एक वर्ष न खेळल्यानंतर देखील त्याला आयपीएलमध्ये योग्य खरेदीदार मिळत असतात. यामुळेच तो दरवर्षी आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. मात्र, दोन वर्षांसाठी त्याला मुक्त करण्यात आले होते. मात्र यावर्षी पुन्हा एकदा त्याने या लीगमध्ये पुनरागमन केले आहे.
हेही वाचा : GT vs PBKS : पंजाब किंग्जने 243 धावा करूनही जीटीने जेरीस आणलं; श्रेयस अय्यरसेनेचा अडखळता विजय…
ग्लेन मॅक्सवेल आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू ठरला आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 135 सामने खेळले असून या काळात तो 19 वेळा भोपळा न् फोडता बाद झाला आहे. हा एक वेगळा विक्रम आहे. यानंतर भारतीय कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. सीएसकेविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा शून्यावर बाद होऊन शून्यावर बाद होणाऱ्यांच्या यादीत अव्वलस्थानी पोहचला होता. आता मात्र मॅक्सवेल 19 वेळा शून्यावर बाद होऊन पहिल्या स्थानी पोहचला आहे. रोहितने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 258 सामने खेळले आहेत. या काळात रोहित शर्मा 18 वेळा शून्यावर बाद झाला आहे. यानंतर दिनेश कार्तिक १८ वेळा शून्यावर बाद झाला आहे.
आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्जकडून ग्लेन मॅक्सवेलला 4.20 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले आहे. पण त्याला विकत घेण्याचा फायदा पंजाब किंग्जला मिळत नाहीये. मंगळवारी गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना रंगला होता. यावेळी ग्लेन मॅक्सवेल फलंदाजीसाठी मैदानात उतरला तेव्हा पंजाब संघाला त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण, असे झाले नाही. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने पहिल्याच चेंडूवर विकेट गमावावी लागली.
हेही वाचा : GT vs PBKS : पंजाब किंग्सच्या ‘या’ युवा खेळाडूची IPL डेब्यूत दमदार खेळी, गंभीरसोबत आहे खास नातं..
इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या 5 व्या सामन्यात पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सवर संघर्षमय विजय मिळवला आहे. या दोन संघातील सामना खूप रोमांचक असा झालेला बघायला मिळाला. या सामन्यात पंजाब किंग्सने गुजरात जायंट्सचा 11 धावांच्या फरकाने पराभव केला. पंजाबने दिलेल्या 244 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला गुजरातचा संघ 232 धावांपर्यंत मजल मारू शकला. एकेकाळी हा सामना जीटी आपलया खिशात सहज टाकेल असे वाटत असतानाच अय्यरचे कर्णधारपद आणि प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेला वेगवान गोलंदाज विजय कुमार याच्या मेहनतीला फळ मिळाले. ज्याचा परिपाक अय्यर आणि कंपनीच्या आयपीएल 2025 मधील पहिल्या विजयात झाला.
पंजाब किंग्स : प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, सूर्यांश शेडगे, अजमतुल्ला ओमरझाई, मार्को जॅन्सन, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, शाहरुख खान, राहुल तेवतिया, आर साई किशोर, अर्शद खान, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा.