GT vs PBKS : पंजाब किंग्जने 243 धावा करूनही जीटीने जेरीस आणलं; श्रेयस अय्यरसेनेचा अडखळता विजय(फोटो-सोशल मीडिय)
GT vs PBKS : इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या 5 व्या सामन्यात पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सवर संघर्षमय विजय मिळवला आहे. या दोन संघातील सामना खूप रोमांचक असा झालेला बघायला मिळाला. या सामन्यात पंजाब किंग्सने गुजरात जायंट्सचा 11 धावांच्या फरकाने पराभव केला. एकेकाळी हा सामना जीटी आपलया खिशात सहज टाकेल असे वाटत असतानाच अय्यरचे कर्णधारपद आणि प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेला वेगवान गोलंदाज विजय कुमार याच्या मेहनतीला फळ मिळाले. ज्याचा परिपाक अय्यर आणि कंपनीच्या आयपीएल 2025 मधील पहिल्या विजयात झाले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने गुजरात टायटन्ससमोर 244 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र गुजरात संघाला हे लक्ष्य पार करण्यात अपयश आले. पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने 97 धावांची तडाखेबाज खेळी केली. याशिवाय प्रियांश आर्यने देखील आपल्या पदार्पणाच्या सामन्यात 47 धावा केल्या. तसेच ऐनवेळी शशांक सिंगने वेगवान 44 धावा केल्या. पंजाबकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर ग्लेन मॅक्सवेल आणि मार्को जॅन्सन यांनी प्रत्येकी 1 विकेट्स मिळवली.
हेही वाचा : IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्ससमोर काळे ढग; ‘हा’ स्टार खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर होण्याची शक्यता…
या सामन्यात एक असा क्षण असा आला की गुजरात टायटन्स विजय मिळवणार. मात्र, विजयकुमार विशकने गुजरातकडून विजय हिसकावून घेतला. विजय कुमारने आपल्या गोलंदाजीने सामना संपवला आणि आपल्या नावे केला. त्याने 15व्या आणि 17व्या षटकात केवळ प्रत्येकी 5 धावा दिल्या. त्यामुळे गुजरात टायटन्स संघ आवश्यक निव्वळ रनरेटपासून दूर फेकला गेला. पंजाबने दिलेल्या 244 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला गुजरातचा संघ 232 धावांपर्यंत मजल मारू शकला. गुजरातकडून साई सुदर्शनने सर्वाधिक 74 धावा केल्या. यानंतर जोस बटलरने 54 धावांची तर शर्फन रदरफोर्डने 46 धावांची खेळी खेळली. मात्र ती विजय मिळवून देण्यास यशस्वी ठरली नाही.
कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर पंजाब किंग्स संघाने प्रथम फलंदाजी केली. पंजाब किंग्स संघाची सुरवात चांगली झाली नाही. सलामीवीर प्रभसिमरन सिंगच्या रूपात पंजाब किंग्सला पहिला धक्का बसला. तो ८ चेंडूत ५ धावा करून माघारी परतला. त्याला कसिगो राबाडाने बाद केले. तर दूसरा सालमीवीर युवा प्रियांश आर्य आपल्या आयपीएल कारकीर्दीतील पहिले अर्धशतक पूर्ण करायला अवघ्या ३ धावा बाकी असताना झेलबाद झाला. त्याने २३ चेंडूत ४७ धावा केल्या. त्याला रशीद खानने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले.
त्यांनंतर चार नंबरवर आलेला अजमतुल्ला ओमरझाई जास्त वेळ टिकाव धरू शकला नाही. तो 15 चेंडूत 16 धावा करून बाद झाला. त्याला साई किशोरने बाद केले. त्यानंतर आलेला ग्लेन मॅक्सवेल देखील साई किशोरच्या पुढच्याच चेंडूवर एलबीडब्ल्यू बाद झाला. त्याला भोपळा देखील फोडता आला नाही. त्यानंतर आलेल्या मार्कस स्टॉइनिसने थोडी फटकेबाजी केली परंतु तो 20 धावाच करू शकला. त्याला साई किशोरने तंबूत पाठवले.
हेही वाचा : GT vs PBKS : पंजाब किंग्सच्या ‘या’ युवा खेळाडूची IPL डेब्यूत दमदार खेळी, गंभीरसोबत आहे खास नातं..
या दरम्यान पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयश अय्यरने कर्णधारपदाला साजेशी अशी खेळी करत जीटीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने 42 चेंडूत 97 धावा करून नाबाद राहिला. या खेळीत त्याने ५ चौकर यानी ९ षटकार लगावले आहे. तर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला शशांक सिंग 15 चेंडूत 44 धावा करत नाबाद राहिला. गुजरातकडून साई किशोरने सर्वाधिक विकेट्स 3 घेतल्या. तर कसिगो राबडा यानी राशीद खान यांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेतली.
कर्णधार श्रेयस अय्यरने शानदार फलंदाजी केली. त्याने 42 चेंडूंचा सामना करत 97 धावा केल्या. यादरम्यान त्याने 5 चौकार आणि तब्बल 9 षटकार लागवले. असे असताना देखील पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर आपले शतक पूर्ण करू शकला नाही. अवघ्या 3 धावांनी त्याचे शतक हुकले. अय्यरला शेवटच्या षटकांमध्ये स्ट्राईक मिळू शकला नाही. शशांक सिंगने शेवटच्या षटकात वादळी खेळी केली. सिराजच्या शेवटच्या षटकात त्याने 23 धावा कुटल्या. शशांकने 16 चेंडूंचा सामना करत वेगवान 44 धावा केल्या.