
T-20 विश्वचषक 2024 ग्रुप A : भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यामध्ये आज सामना रंगणार आहे. हा सामना 9 जून रोजी रात्री 8 वाजता रंगणार आहे. परंतु या दोन्ही संघाचे T – 20 विश्वचषक 2024 मध्ये आतापर्यत एक एक साखळी सामना पार पडला आहे. भारताचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध झाला तर पाकिस्तानचा पहिला सामना यूएसएविरुद्ध झाला आहे. भारताच्या संघाने आयर्लंडविरुद्ध हा सामना 8 विकेट्सने जिंकला आहे. तर पाकिस्तानच्या संघाने यूएसएविरुद्ध (USA) सामना सुपर ओव्हरमध्ये गमावला आहे. आजचा सामना म्हणजेच भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामधील सामना पाकिस्तानसाठी महत्वाचा असणार आहे.
[read_also content=”भारत-पाक सामन्यात करेल का पाऊस एंट्री? वाचा हवामानाची अपडेट https://www.navarashtra.com/sports/will-rain-make-an-entry-in-india-vs-pakistan-match-read-weather-updates-545170.html”]
जाणून घ्या विश्वचषकातील ग्रुप A चे गुणतालिकेचं गणित
गुणतालिकेतचं गणित पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. T – 20 विश्वचषक 2024 मधील ग्रुप A मध्ये भारत, पाकिस्तान, यूएसए, कॅनडा आणि आयर्लंड हे संघ आहेत. विश्वचषकातील ग्रुप A च्या गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर यूएसएचा संघ आहे. या संघाचे आतापर्यत २ सामने झाले आहेत. या संघाने दोन्हीही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. भारताचा आतापर्यत फक्त एक साखळी सामना झाला आहे. यामध्ये भारताच्या संघाने पहिल्या सामन्यात आयर्लंड विरुद्ध 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. कॅनडाचा संघ तिसऱ्या स्थानावर तर चौथ्या स्थानावर पाकिस्तान आहे. कॅनडाने 2 सामन्यांपैकी 1 सामन्यामध्ये विजय मिळवला आहे तर पाकिस्तानला यूएसएविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला. आयर्लंडच्या संघाने आतापर्यत 2 सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.
यूएसएचे आता दोन सामने शिल्लक आहेत. अमेरिकेचा एक सामना भारतासोबत आणि एक आयर्लंडशी आहे. आयर्लंडविरुद्ध जिंकल्यास पाकिस्तानचा मार्ग कठीण होईल. पाकिस्तानचा आज सामना भारताविरुद्ध आहे. यानंतर संघ कॅनडा आणि आयर्लंडविरुद्ध मैदानात उतरेल. मागील सामन्यात कॅनडाने आयर्लंडचा पराभव केला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध विजय मिळवणे पाकिस्तानला सोपे जाणार नाही. त्यामुळे आता गटातील गुणतालिकेचं गणित मनोरंजक झाले आहे.