
Bangladesh Replace Pakistan In Asian Hockey Champions Trophy
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, हॉकी इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६ ही २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान सुरू होईल. यामध्ये भारताव्यतिरिक्त जपान, चीन, मलेशिया, दक्षिण कोरिया आणि बांग्लादेशचे संघ सहभागी होतील. आंतरराष्ट्रीय हॉकी जवळपास दोन दशकांनंतर पंजाबमध्ये परत येत आहे. २०२३ मध्ये पाकिस्तान संघ शेवटचा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला होता. त्या वर्षी ते सहा संघांपैकी पाचव्या स्थानावर राहिले होते. आगामी स्पर्धेत सहभागी होण्यास पाकिस्तानने नकार दिल्यानंतर, राखीव संघ म्हणून ठेवलेल्या बांग्लादेश आणि ओमानमधून बांग्लादेश हॉकी संघाचा मुख्य स्पर्धेत समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
स्पर्धेची घोषणा झाल्यानंतर पाकिस्तान हॉकी फेडरेशनने भारतात खेळण्यास स्पष्ट नकार दिला आणि आपले सामने तटस्थ ठिकाणी आयोजित करण्याची मागणी केली. परंतु, ही मागणी नंतर फेटाळण्यात आली. यामुळे , पाकिस्तान आता स्पर्धेतून बाहेर पडला असून, बांग्लादेशने सहावा संघ म्हणून स्पर्धेत प्रवेश केला आहे.
भारताने चार वेळा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीचे विजेतेपद पटकावले आहे. याशिवाय, भारताने नुकतेच २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदकावर आफले नाव कोरले. या स्पर्धेत भारताने उत्कृष्ट कामगिरी केली. सुवर्णपदकासोबतच भारताने २०२८ च्या ऑलिम्पिकमधील आपले स्थानही निश्चित केले. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघ उत्कृष्ट कामगिरी करत आहे. आता आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.भारतीय आणि पाकिस्तानी हे दोन्ही देश नेहमी आयसीसी आणि आशिया कप स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळतात.