GT vs PBKS : आयपीएल 2025 चा 5 वा सामना आज 25 मार्च रोजी गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळला जात आहे. गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करत गुजरात टायटन्ससमोर २४४ धावांचे आव्हान दिले आहे. श्रेयस अय्यरच्या ९७ धावांच्या जोरावर पंजाब किंग्सने २४३ धावांपर्यंत मजल मारली आहे. हा सामना जिंकण्यासाठी जीटीला २४४ धावा कराव्या लागणार आहे. गुजरातकडून साई किशोरने सर्वाधिक विकेट्स ३ घेतल्या. या सामन्या दरम्यान सलामीला आलेला युवा खेळाडू प्रियांश आर्य याने आपल्या छोटेखानी खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने २३ चेंडूत ४७ धावा केल्या आहेत. उल्लेखनीय असे की प्रियांशचा पंजाब किंग्सकडून हा आयपीएलमधील डेब्यू सामना होता.
पंजाब किंग्स संघाची सुरवात चांगली झाली नाही. सलामीवीर प्रभसिमरन सिंगच्या रूपात पंजाब किंग्सला पहिला धक्का बसला. तो ८ चेंडूत ५ धावा करून माघारी परतला. त्याला कसिगो राबाडाने बाद केले. तर दूसरा सालमीवीर युवा प्रियांश आर्य आपल्या आयपीएल कारकीर्दीतील डेब्यू सामन्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचे पहिले अर्धशतक पूर्ण करायला अवघ्या ३ धावा कमी पडल्या. तो ४७ धावांवर असताना झेलबाद झाला. त्याने २३ चेंडूत ४७ धावा केल्या. त्याला रशीद खानने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले.
हेही वाचा : GT vs PBKS : पंजाब किंग्सचा गुजरात टायटन्ससमोर २४४ धावांचा डोंगर; श्रेयस अय्यरची विस्फोटक खेळी..
आयपीएल २०२५ मधील पहिल्याच सामन्यात पंजाब किंग्जने दिल्ली प्रीमियर लीगमध्ये खळबळ माजवणाऱ्या वादळी खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. त्याने त्याच सोनं करत ४७ धावांची खेळी केली. हा खेळाडू प्रियांश आर्य आहे ज्याला गुजरात टायटन्सविरुद्ध पदार्पणाची संधी मिळाली आहे. प्रियांश आर्य हा दिल्लीसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो आणि गेल्या वर्षी त्याने दिल्ली प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक ६०८ धावा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. प्रियांशने दिल्ली प्रीमियर लीगच्या स्पर्धेत ४३ षटकार मारले होते आणि एका सामन्यात त्याने त्याच्या बॅटमधून सलग ६ षटकारची बरसात देखील केली होती.
प्रियांश आर्य त्याच्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. हा डावखुरा फलंदाज जेव्हा मैदानावर येतो तेव्हा चांगल्यात चांगल्या गोलंदाजांची देखील लाईन-लेन्थ बिघवण्यात माहिर आहे. आर्य हा पॉवरप्लेमध्ये स्फोटक फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो.
हेही वाचा : IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्ससमोर काळे ढग; ‘हा’ स्टार खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर होण्याची शक्यता…
प्रियांश आर्यचेही गौतम गंभीरसोबत खास नाते आहे. प्रियांश त्याच व्यक्तीकडून क्रिकेटचे धडे शिकत आहे ज्याने गौतम गंभीरला देखील क्रिकेटचे धडे दिले आहे. प्रियांशचे गुरू देखील संजय भारद्वाज असल्याची माहिती मिळत आहे. प्रियांशने एका मुलाखत दरम्यान सांगितले आहे की, त्याची फलंदाजी आणि शॉट खेळण्याचे तंत्र हे सर्व संजय भारद्वाजमुळे आहे. असे प्रियांशने सांगितले आहे.
पंजाब किंग्स : प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, सूर्यांश शेडगे, अजमतुल्ला ओमरझाई, मार्को जॅन्सन, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, शाहरुख खान, राहुल तेवतिया, आर साई किशोर, अर्शद खान, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा.