GT vs PBKS : पंजाब किंग्सचा गुजरात टायटन्ससमोर २४४ धावांचा डोंगर; श्रेयस अय्यरची विस्फोटक खेळी.. (फोटो-सोशल मीडिया)
GT vs PBKS : आयपीएल २०२५ चा 5 वा सामना आज 25 मार्च रोजी गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळला जात आहे. गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करत गुजरात टायटन्ससमोर २४४ धावांचे आव्हान दिले आहे. श्रेयस अय्यरच्या ९७ धावांच्या जोरावर पंजाब किंग्सने २४३ धावांपर्यंत मजल मारली आहे. हा सामना जिंकण्यासाठी जीटीला २४४ धावा कराव्या लागणार आहे. गुजरातकडून साई किशोरने सर्वाधिक विकेट्स ३ घेतल्या.
कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर पंजाब किंग्स संघाने प्रथम फलंदाजी केली. पंजाब किंग्स संघाची सुरवात चांगली झाली नाही. सलामीवीर प्रभसिमरन सिंगच्या रूपात पंजाब किंग्सला पहिला धक्का बसला. तो ८ चेंडूत ५ धावा करून माघारी परतला. त्याला कसिगो राबाडाने बाद केले. तर दूसरा सालमीवीर युवा प्रियांश आर्य आपल्या आयपीएल कारकीर्दीतील पहिले अर्धशतक पूर्ण करायला अवघ्या ३ धावा बाकी असताना झेलबाद झाला. त्याने २३ चेंडूत ४७ धावा केल्या. त्याला रशीद खानने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले.
त्यांनंतर चार नंबरवर आलेला अजमतुल्ला ओमरझाई जास्त वेळ टिकाव धरू शकला नाही. तो १५ चेंडूत १६ धावा करून बाद झाला. त्याला साई किशोरने बाद केले. त्यानंतर आलेला ग्लेन मॅक्सवेल देखील साई किशोरच्या पुढच्याच चेंडूवर एलबीडब्ल्यू बाद झाला. त्याला भोपळा देखील फोडता आला नाही. त्यानंतर आलेल्या मार्कस स्टॉइनिसने थोडी फटकेबाजी केली परंतु तो २० धावाच करू शकला. त्याला साई किशोरने तंबूत पाठवले.
या दरम्यान पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयश अय्यरने कर्णधारपदाला साजेशी अशी खेळी करत जीटीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने ४२ चेंडूत ९७ धावा करून नाबाद राहिला. या खेळीत त्याने ५ चौकर यानी ९ षटकार लगावले आहे. तर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला शशांक सिंग १५ चेंडूत ४४ धावा करत नाबाद राहिला. गुजरातकडून साई किशोरने सर्वाधिक विकेट्स ३ घेतल्या. तर कसिगो राबडा यानी राशीद खान यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतली.
दोन्ही संघांचा या हंगामातील हा पहिलाच सामना आहे. त्यामुळे दोन्ही संघ आपल्या मोहिमीची विजयी सुरुवात करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे.
श्रेयस अय्यर आयपीएल च्या सर्वात महागड्या कर्णधारांच्या यादीत ऋषभ पंतनंतर दुसऱ्या स्थानावर जाऊन बसला आहे. यापूर्वी अय्यर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार होता. त्याने गेल्या वर्षी 2024 मध्ये कोलकाता संघाला आयपीएल 2024 चे विजेतेपद पटकावून दिले होते. अशा स्थितीत पंजाब किंग्ज संघाला या मोसमात देखील अय्यरकडून मोठ्या अपेक्षा असणार आहेत.
हेही वाचा : GT vs PBKS : गोलंदाजांचा वेग की फलंदाजांची हाणामारी? अहमदाबादची खेळपट्टी नेमकी कशी? जाणून घ्या…
पंजाब किंग्स : प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, सूर्यांश शेडगे, अजमतुल्ला ओमरझाई, मार्को जॅन्सन, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, शाहरुख खान, राहुल तेवतिया, आर साई किशोर, अर्शद खान, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा.