फोटो सौजन्य - JioHotstar सोशल मीडिया
Ryan Parag’s wicket : बुधवारी ०९ एप्रिल रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला. आयपीएल २०२५ च्या २३ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा ५८ धावांनी पराभव केला. या पराभवासह राजस्थान रॉयल्सचा हा या स्पर्धेमधील तिसरा पराभव आहे. या तीन पराभवासह सध्या राजस्थानचा संघ पॉईंट टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे. गुजरातच्या विजयापूर्वी, आरआरचा स्टार फलंदाज रियान परागच्या विकेटवरून बराच गोंधळ उडाला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि यावरून क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे.
खरंतर, तिसऱ्या पंचाने रियान परागच्या विकेटबाबत वादग्रस्त निर्णय दिला, ज्यामुळे फलंदाज खूश नव्हता. त्याने मैदानावर उपस्थित असलेल्या पंचांशी याबद्दल बोलले, पण कोणीही त्याचे ऐकले नाही. शेवटी परागला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. तुम्हाला सांगतो की, गुजरातने प्रथम फलंदाजी करत २१७ धावा केल्या, ज्याला प्रत्युत्तर म्हणून संपूर्ण राजस्थान संघ १५९ धावांवर ऑलआउट झाला.
राजस्थान रॉयल्सच्या डावाच्या ७ व्या षटकात रियान परागच्या विकेटवरून गोंधळ उडाला. परागला कुलवंत खेजरोलियाचा चौथा चेंडू ड्राईव्ह करायचा होता पण तो चुकला. जोस बटलरने यष्टीमागे चेंडू पकडला आणि जोरदार अपील केले. त्याला मैदानावर उभ्या असलेल्या पंचांचा पाठिंबा मिळाला आणि परागला बाद घोषित करण्यात आले.
Riyan Parag was definitely NOT OUT!
The ball’s shadow can be seen clearly on the bat and the snicko showed a spike before the ball reached the bat, i.e. the bat did hit the ground and hence the spike.
Rajasthan Royals robbed! Ridiculous umpiring! pic.twitter.com/TSVIJ2q1N3— Harsh Goyal (@go86964584) April 9, 2025
रियान परागने ताबडतोब पंचांच्या निर्णयाला आव्हान दिले आणि डीआरएस मागितला. जेव्हा तिसऱ्या पंचांनी रिप्लेमध्ये पाहिले की रियान परागची बॅट चेंडू लागण्यापूर्वी जमिनीला स्पर्श करून गेली होती, तेव्हा राजस्थानच्या खेळाडूने सुटकेचा नि:श्वास सोडला. तथापि, असे असूनही तिसऱ्या पंचांनी त्याला बाद घोषित केल्यावर तो संतापला. खरंतर, जेव्हा बॅट जमिनीला स्पर्श करत होती तेव्हा स्निको मीटरमध्ये एक स्पाइक दिसला, परंतु चेंडू बॅटपासून दूर जाईपर्यंत स्पाइक तसाच राहिला. अशा परिस्थितीत, तिसऱ्या पंचाने मैदानावर उपस्थित असलेल्या पंचांच्या निर्णयाचे पालन केले आणि परागला बाद घोषित केले.
तिसऱ्या पंचाच्या निर्णयावर रियान पराग खूपच नाराज दिसत होता आणि त्याने मैदानावरील पंचांशीही त्याबद्दल वाद घातला. तथापि, त्याचे प्रयत्न व्यर्थ गेले आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. पॅव्हेलियनमध्ये जाताना त्याने बॅट मारून आपला राग व्यक्त केला. पराग शानदार फलंदाजी करत होता आणि १४ चेंडूत २६ धावा काढून बाद झाला.