फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru/Delhi Capitals सोशल मीडिया
RCB Vs DC Pitch Reports : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल २०२५ चा २४ वा सामना १० एप्रिल रोजी खेळला जाणार आहे. हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यांमध्ये दोन्ही संघाच्या कामगिरीवर नजर टाकली तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने आतापर्यत ४ सामने खेळले आहेत यामध्ये त्यांना ३ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे, तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सचा संघ सध्या या स्पर्धेमध्ये मजबूत संघ आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने ४ सामने खेळले आहेत यामध्ये त्यांनी सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवून संघ अजुनपर्यत स्पर्धेमध्ये अपराजित आहे.
मागील सामन्यात आरसीबीचा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध झाला होता, या सामन्यात पाच वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सचा १२ धावांनी पराभव केला. त्याच वेळी, दिल्ली कॅपिटल्स संघाने चालू हंगामात एकही सामना गमावलेला नाही. अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स आता त्यांच्या चौथ्या विजयाकडे लक्ष केंद्रित करेल. कालच्या सामन्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे तर बंगळुरूचा संघ पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.
शेवटच्या सामन्यात दिल्लीने सीएसकेचा २५ धावांनी पराभव केला. आता आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एक रोमांचक सामना खेळला जाऊ शकतो, परंतु दिल्लीसाठी आरसीबीला त्यांच्याच घरच्या मैदानावर हरवणे सोपे नसेल. अशा परिस्थितीत, बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल जाणून घेऊया.
When Delhi’s own Virat Kohli locks horns with the Delhi Capitals, and Bengaluru’s KL Rahul stares down RCB—you know it’s more than just runs.
It’s personal. It’s pride. It’s Rivalry Week! 🔥 #IPLRivalryWeek#IPLonJioStar 👉 #RCBvDC | THU, 10 Apr | 6:30 PM LIVE on Star Sports 1,… pic.twitter.com/55yXOqP1MN
— Star Sports (@StarSportsIndia) April 10, 2025
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना १० एप्रिल रोजी बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. या मैदानावर फलंदाज मोठे फटके मारताना दिसतात. खेळाच्या सुरुवातीला गोलंदाजांना मदत मिळते. त्यानंतर फिरकीपटूंचे वर्चस्व दिसून येते. येथे नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावते आणि जो कर्णधार नाणेफेक जिंकतो तो प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देतो.
एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आतापर्यत ९६ सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे आणि आतापर्यत पहिले फलंदाजी करत ४१ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर नंतर फलंदाजी करणारा संघ ५१ सामने जिंकला आहे. या मैदानावर नाणेफेक फार महत्वाचे आहे. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने ५१ सामने जिंकले आहेत तर नाणेफेक गमावणाऱ्या संघाने ४१ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. या मैदानावर ४ सामने अनिर्णयीत राहिले आहेत.
एम चिन्नास्वामी मैदानावर सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ख्रिस गेल याची पुणे वॉरियर्स विरुद्ध आरसीबीकडून खेळत १७५* असताना २०१३ मध्ये त्याने केली होती. सर्वाधिक सांघिक धावसंख्या २८७/३ सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या सामन्यात २०२४ मध्ये केली होती. तर या मैदानावर सर्वात कमी संघ धावसंख्या ८२ आरसीबी विरुद्ध केकेआर या सामान्यत २००८ मध्ये करण्यात आली होती.