Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gulveer Singh चा CWG 2026 मध्ये ऐतिहासिक पराक्रम! 5000 मीटरमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय

Gulveer Singh won Bronze 5000 M race in CWG 2026 Glasgow: भारतीय खेळाडू गुलवीर सिंगने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या ५००० मीटर शर्यतीत कांस्य पदक जिंकून इतिहास रचला असून, या स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिला भारतीय धावपटू ठरला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 02, 2026 | 01:41 PM
Gulveer Singh चा CWG 2026 मध्ये ऐतिहासिक पराक्रम! 5000 मीटरमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय
Follow Us
Follow Us:
  • Gulveer Singh चा CWG 2026 मध्ये ऐतिहासिक पराक्रम
  • 5000 मीटरमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय
  • गुलवीरने शेवटच्या क्षणांमध्ये जिंकले पदक

स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे राष्ट्रकुल क्रीडा २०२६ ( Commonwealth Games 2026) च्या स्पर्धेत १ ऑगस्ट हा भारतासाठी एक ऐतिहासिक दिवस ठरला .बॉक्सर आणि वेटलिफ्टिंगसह ॲथलेटिक्समध्येही प्रभावी कामगिरी पाहायला मिळाली. ॲथलेटिक्समध्ये गुलवीर सिंगने इतिहास रचला. गुलवीर सिंग हा ५००० मीटर शर्यतीत १३:२४.९५ अशी वेळ नोंदवून कांस्यपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला. तसेच, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ॲथलेटिक्समध्ये एकापेक्षा जास्त पदके जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्याने या स्पर्धेत एक नव्हे तर दोन पदके जिंकून इतिहास रचला. यापूर्वी गुलवीर याने १०,००० मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले होते.

CWG 2026: भारताची दुहेरी कमाल! शॉटपुटमध्ये Soman Rana ने जिंकले ‘गोल्ड’; शुभम जुयालच्या गळ्यात सिल्व्हर

गुलवीरने शेवटच्या क्षणांमध्ये जिंकले पदक

ग्लासगो गेम्सच्या दहाव्या दिवशी, शनिवार, १ ऑगस्ट रोजी ५००० मीटरची शर्यत पार पडली. भारताच्या गुलवीरने सुरुवातीपासूनच आपले मजबूत स्थान टिकवून ठेवले होते. अंतिम फेरीपर्यंत तो पहिल्या पाचमध्ये होता. मग, अंतिम फेरी सुरू होताच, तो क्षणभरासाठी चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरला. पण शेवटच्या क्षणी २०० ते ३०० मीटरमध्ये केनियाच्या कॉर्नेलियस केम्बोईने त्याला मागे टाकण्याचा जोरदार प्रयत्न केला, पण गुलवीरने हार मानली नाही आणि अखेरीस १३:२४:९५ वेळेत शर्यत पूर्ण करून कांस्यपदक जिंकले. या स्पर्धेत केनियाच्या मॅथ्यू किपसांगने १३:२३:६१ वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले, तर ऑस्ट्रेलियाच्या के रॉबिन्सनने १३:२४:७० वेळ नोंदवून रौप्यपदक जिंकले.

या स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय

या विजयासह, गुलवीर सिंग ५००० मीटर शर्यतीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. इतकेच नव्हे तर, एकाच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दोन वेगवेगळी ॲथलेटिक्स पदके जिंकणारा तो पहिला भारतीयही ठरला. या यशस्वी शर्यतीच्या चार दिवस आधी, त्याने १०,००० मीटर शर्यतीत रौप्य पदकही जिंकले होते, ज्यामुळे हे पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. तिथेही ऑस्ट्रेलियाच्या रॉबिन्सनने त्याला नमवत सुवर्णपदक जिंकले होते.

सैन्यात भरती होण्यासाठी धावण्याची सुरुवात

उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यातील २८ वर्षीय रहिवासी गुलवीर सिंग याने सैन्यात भरती होण्यासाठी धावायला सुरुवात केली आणि २०१८ मध्ये तो भारतीय सैन्यात दाखल झाला. सैन्यात दाखल झाल्यानंतरही त्याने धावणे सुरूच ठेवले, ज्यामुळे गुलवीरला ॲथलेटिक्समध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. गुलवीरने २०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत १०,००० मीटरच्या शर्यतीत भाग घेऊन कांस्य पदक जिंकले. इतकेच नाही तर, २०२६ मध्ये जेव्हा गुलवीरने हाफ मॅरेथॉन केवळ ५९ मिनिटे आणि ४२ सेकंदात पूर्ण केली, तेव्हा तो एका तासापेक्षा कमी वेळेत ही शर्यत पूर्ण करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला.

भारताच्या गोल्डन गर्लचा बॉक्सिंगमध्ये तुफान पंच! प्रीती पवारने CWG 2026 मध्ये जिंकले ऐतिहासिक सुवर्णपदक

Web Title: Gulveer singh won bronze medal 5000m race athletics in cwg 2026 glasgow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • Athletics
  • commonwealth games 2026
  • Indian Athlete

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.