Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सैन्यात जाण्याचे स्वप्न, पण नशिबाने बनवला भारताचा स्टार धावपटू; CWG 2026 मध्ये रौप्य जिंकणारा गुलवीर सिंग कोण?

gulveer singh Won Silver medal in CWC 2026: भारतीय सैन्यात नायब सुभेदार म्हणून कार्यरत असलेल्या गुलवीर सिंग यांनी २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या १०,००० मीटर शर्यतीच्या अंतिम फेरीत रौप्य पदक जिंकून इतिहास रचला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 29, 2026 | 01:25 PM
सैन्यात जाण्याचे स्वप्न, पण नशिबाने बनवला भारताचा स्टार धावपटू; CWG 2026 मध्ये रौप्य जिंकणारा गुलवीर सिंग कोण?
Follow Us
Follow Us:
  • सैन्यात जाण्याचे स्वप्न, पण नशिबाने बनवला भारताचा स्टार धावपटू
  • CWG 2026 मध्ये रौप्य जिंकणारा गुलवीर सिंग कोण?
  • गुलवीर सिंगचा संघर्षमय प्रवास
राष्ट्रकुल क्रीडा २०२६ च्या ( Commonwealth Games 2026)  स्पर्धेतील ॲथलेटिक्सच्या ट्रॅकवर भारताचा झेंडा पुन्हा एकदा उंचावला आहे. २७ वर्षीय भारतीय धावपटू गुलवीर सिंगने २८ जुलै रोजी स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या १०,००० मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकून इतिहास रचला. भारतीय सैन्यात नायब सुभेदार म्हणून नियुक्त झालेल्या गुलवीर सिंग या स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

CWG 2026: जादुमणिचा ‘पंच’ ठरला भारी; पाकिस्तानी बॉक्सरला नमवले, कारगिल शहिदांना समर्पित केला विजय

कोण आहे भारतीय नायब सुभेदार गुलवीर सिंग?

१ जून १९९८ रोजी एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या गुलवीर सिंगच्या गावात खेळांबद्दल फारशी चर्चा नव्हती. तिथल्या तरुणांचे सर्वात मोठे स्वप्न भारतीय सैन्यात भरती होण्याचे होते. गुलवीर त्या तरुणांपैकीच एक होता. त्याला राष्ट्रकुल खेळ किंवा आशियाई खेळांबद्दल फारशी माहिती नव्हती. त्याच्यासाठी धावणे हे पदक जिंकण्याचा मार्ग नसून, सैन्यात नोकरी मिळवण्याचा एक मार्ग होता. तो क्रीडा कोट्यातून भारतीय सैन्यात दाखल झाला आणि ग्रेनेडियर्स रेजिमेंटचा भाग बनला. हाच त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये आणि नंतर भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) च्या राष्ट्रीय शिबिरात त्याला जाणवले की, धावणे हे केवळ उदरनिर्वाहाचे साधन नसून देशासाठी इतिहास घडवण्याची एक संधी आहे.

भारतीय सैन्यात दाखल झाल्यानंतरही गुलवीर सिंगने धावणे सुरू ठेवले आणि त्याला २०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत १०,००० मीटर शर्यतीत भाग घेण्याची संधी मिळाली, जिथे त्याने कांस्य पदक जिंकले. त्याने २०२३ च्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पणही केले, जिथे त्याने ५,००० मीटर शर्यतीत कांस्य पदक जिंकले.

गुलवीर सिंगचा संघर्षमय प्रवास

गुलवीर सिंगचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. या २७ वर्षीय खेळाडूने भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी धावायला सुरुवात केली आणि याच आधारावर त्याला सैन्यात नोकरी मिळवण्यात यश आले. गुलवीर सिंग हा उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यातील सिरसा गावचा रहिवासी असून, २०१८ मध्ये भारतीय सैन्याच्या प्रतिष्ठित ग्रेनेडियर्स रेजिमेंटमध्ये सामील झाल्यानंतर त्याने धावणे सुरूच ठेवले, ज्यामुळे त्याचा ॲथलेटिक्समध्ये सहभाग वाढला आणि तो आपल्या प्रतिभेने संपूर्ण देशाला गौरव मिळवून देत आहे. गुलवीरने अंतिम रेषा ओलांडली, तेव्हा घड्याळ २७ मिनिटे ४९.७८ सेकंदांवर थांबले. ही केवळ एक वेळ नव्हती, तर अनेक वर्षांच्या संघर्षाचे, शिस्तीचे आणि स्वप्नांचे फळ होते. रौप्य पदक जिंकून गुलवीरने इतिहास रचला.

Gulveer Singh creates history, becoming the first Indian to win a Commonwealth Games medal in the Men’s 10,000m with a brilliant silver medal finish. 👏 Watch the Commonwealth Games Glasgow 2026 LIVE & EXCLUSIVE on Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork… pic.twitter.com/6VIXZysfBJ — Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 28, 2026

याआधीही मोडले अनेक विक्रम

भारतीय सैन्यात नायब सुभेदार म्हणून कार्यरत असलेल्या गुलवीर सिंग यांच्या नावावर १०,००० मीटर, ५,००० मीटर, हाफ मॅरेथॉन आणि एक मैल धावण्याच्या स्पर्धांमध्ये राष्ट्रीय विक्रम आहेत. २०२६ मध्ये, गुलवीरने हाफ मॅरेथॉन केवळ ५९ मिनिटे आणि ४२ सेकंदात पूर्ण करून, एका तासापेक्षा कमी वेळेत ही शर्यत पूर्ण करणारे पहिले भारतीय खेळाडू बनण्याचा मान मिळवला. यापूर्वी, गुलवीर सिंगने २०२५ मध्ये आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ५,००० आणि १०,००० मीटर स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली होती. मे २०२६ मध्ये, अमेरिकेतील म्युझिक सिटी कार्निव्हलमध्ये चार मिनिटांपेक्षा कमी वेळेत एक मैल धावणारे गुलवीर सिंग हे पहिले भारतीय ठरले.

वडिलांची मजुरी, भावाचा त्याग अन् Raja Muthupandi ची मेहनत; CWG 2026 मध्ये भारतासाठी मिळवले रौप्यपदक

Web Title: Gulveer singh won silver medal in 10000 m race in cwg 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • Athletics
  • commonwealth games 2026

संबंधित बातम्या

Commonwealth Games 2026: कोण आहे हरजिंदर कौर? भुसा कापणाऱ्या मशीनने मिळवली ताकद, भारतासाठी जिंकले रौप्य पदक
1

Commonwealth Games 2026: कोण आहे हरजिंदर कौर? भुसा कापणाऱ्या मशीनने मिळवली ताकद, भारतासाठी जिंकले रौप्य पदक

CWG 2026: मुलींसह घर सोडलं, हुंड्याचा दंश सोसला अन्…! शर्मिला धनखरने ‘राष्ट्रकुल’मध्ये जिंकले Gold Medal
2

CWG 2026: मुलींसह घर सोडलं, हुंड्याचा दंश सोसला अन्…! शर्मिला धनखरने ‘राष्ट्रकुल’मध्ये जिंकले Gold Medal

Commonwealth Games 2026 मध्ये महाराष्ट्रच्या लेकाचा डंका; हाय जंपमध्ये सर्वेशने भारतासाठी जिंकले ‘रौप्य’ पदक
3

Commonwealth Games 2026 मध्ये महाराष्ट्रच्या लेकाचा डंका; हाय जंपमध्ये सर्वेशने भारतासाठी जिंकले ‘रौप्य’ पदक

CWG 2026: जादुमणिचा ‘पंच’ ठरला भारी; पाकिस्तानी बॉक्सरला नमवले, कारगिल शहिदांना समर्पित केला विजय
4

CWG 2026: जादुमणिचा ‘पंच’ ठरला भारी; पाकिस्तानी बॉक्सरला नमवले, कारगिल शहिदांना समर्पित केला विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.