फोटो सौजन्य - JioHotstar/IPL
आयपीएल २०२५ च्या पॉईंट टेबलवर नजर टाकली तर गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स, लखनौच्या संघ या स्पर्धेमध्ये कमालीची कामगिरी करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे नजर टाकली आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स हैदराबाद, कोलकाता आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ सध्या तळाला आहेत. आतापर्यत झालेल्या स्पर्धेमध्ये हे संघ चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत.
आयपीएलच्या या सीझनमध्ये ५ वेळा चॅम्पियन असलेल्या महेंद्रसिंहचा संघ चेन्नई सुपर किंग्जची अवस्था खूपच वाईट आहे. आतापर्यंत त्याला ८ सामन्यांत फक्त २ विजय मिळाले आहेत. सीएसके आयपीएल पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे आणि प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. हरभजन सिंग आणि सुरेश रैना सीएसकेची अशी दुर्दशा सहन करू शकत नाहीत. हे दोघेही पूर्वी चेन्नईकडून खेळले आहेत आणि आता त्यांना समालोचक म्हणून आयपीएलमध्ये काम करत आहेत. कॉमेंट्री दरम्यान, दोघांनीही सीएसकेवर आपला राग व्यक्त केला आणि त्यांच्या लिलावाच्या धोरणावर प्रश्न उपस्थित केले.
हर्षा भोगलेचा ‘बेबाक बोल’ ठरला महागडा! आयपीएल 2025 च्या मध्यात अडचणी वाढल्या, BCCI बॅन करणार?
रविवारी २० एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्जला त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सविरुद्ध ९ विकेट्सने निराशाजनक कामगिरीमुळे पराभव पत्करावा लागला. त्याच सामन्याच्या समालोचनाच्या वेळी, हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांनी सीएसकेच्या लिलावाच्या रणनीतीचा पर्दाफाश केला.
सीएसकेचे माजी उपकर्णधार सुरेश रैना म्हणाले, ‘मला वाटते कुठेतरी त्यांनी (सीएसके) लिलाव चांगला केला नाही. लिलावात खूप प्रतिभावान खेळाडू होते, खूप तरुण होते. तो खेळाडू कुठे आहे? तुम्ही लिलावासाठी इतके पैसे घेता. तू ऋषभ पंतला वगळलेस , श्रेयस अय्यरला वगळलेस , केएल राहुलला वगळलेस. मी कधीही चेन्नई सुपर किंग्सला अशा प्रकारे संघर्ष करताना पाहिले नाही. सुरेश रैनाचा कॉमेंट्री बॉक्स पार्टनर हरभजन सिंगनेही त्याच्याशी सहमती दर्शवली आणि चेन्नई सुपर किंग्जच्या टॅलेंट स्काउटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
Suresh Raina highlights CSK’s auction missteps amid their struggles this season. 🫣#IPL2025 #CSK #SureshRaina pic.twitter.com/V6c8x6l3yQ
— Sportskeeda (@Sportskeeda) April 21, 2025
भज्जी म्हणाला, ‘सीएसके हा खूप मोठा संघ आहे. जेव्हा ते लिलावात गेले तेव्हा त्यांच्याकडे तो पर्याय होता. त्या खेळाडूंना घेता आले असते. तरुणांमध्येही, असा कोणताही तरुण नव्हता जो खेळ बदलून टाकणारा डाव खेळू शकेल. जे लोक त्यांच्या त्यांच्या अनुभवाचा वापर करून प्रतिभेचा शोध घेतात त्यांना हे देखील विचारले पाहिजे की त्यांनी आम्हाला ती माहिती दिली होती का ज्यामुळे आम्ही या लोकांना निवडण्यात आले आहे. चेन्नई सुपर किंग्जचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड हंगामाच्या मध्यात दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. त्याच्यानंतर, ४३ वर्षीय महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा संघाची सूत्रे हाती घेतली आहेत.