Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग पंजाबच्या पूरग्रस्तांसाठी बनला देव! कोट्यवधी रुपयांची मदत करण्यासाठी घेतला पुढाकार

पंजाबमधील पुरामुळे सध्या लोक त्रस्त आहेत. पूरग्रस्त भागात बरेच नुकसान झाले आहे आणि आता माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनी मदत पुरवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे, त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 08, 2025 | 10:21 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

पंजाबमधील पुरामुळे अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे तर लाखो लोकांना त्यांची घरदार देखील गमावावी लागली आहेत. पंजाब मधील पूरग्रस्त परिस्थितीनंतर पंजाबच्या अनेक अभिनेत्यांनी कलाकारांनी नागरिकांना मदत केली आता भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंग उर्फ भजी याने देखील कोट्यावधींची मदत पूरग्रस्तांना केली आहे. पंजाब जम्मू कश्मिरमधील अनेकांना त्याच्या कुटुंबातील सदस्यांना गमवावे लागले आहे. 

पंजाबमधील पुरामुळे सध्या लोक त्रस्त आहेत. पूरग्रस्त भागात बरेच नुकसान झाले आहे आणि आता माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनी मदत पुरवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. रुग्णवाहिकांपासून ते बोटींपर्यंत सर्व काही पुरवून हरभजन सिंग पंजाबमधील लोकांसाठी मसीहा म्हणून उदयास येत आहे.

AFG vs PAK : ट्राय सिरीजच्या फायनलच्या सामन्यात पाकिस्तानने मारली बाजी, अफगाणिस्तानला 75 धावांनी केलं पराभूत

हरभजनने पूरग्रस्तांना केली मदत

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, हरभजन सिंग यांनी पंजाबमधील परिस्थिती लक्षात घेता ११ स्टीमर बोटी दान केल्या आहेत. त्यांनी खासदार निधीतून ८ आणि स्वतःच्या खिशातून ३ बोटी खरेदी केल्या आहेत. प्रत्येक बोटीची किंमत ४.५ ते ५.५ लाख रुपये आहे. याशिवाय, हरभजन सिंग यांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी तीन रुग्णवाहिका देखील खरेदी केल्या आहेत. याद्वारे ते गरजूंना रुग्णालयात पोहोचण्यास मदत करू शकतात.

This is the time to stand with Punjab. Our brothers and sisters are in need, and it is our shared responsibility to support them. Together, we can rebuild, restore, and bring hope back to Punjab. I humbly request you all to come forward and lend your support in any way you can… pic.twitter.com/GqwZjyxaFe — Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) September 4, 2025

पंजाबमध्ये सध्या पुरामुळे परिस्थिती खूपच वाईट आहे. गेल्या काही आठवड्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे आणि नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत आणि शहरांचेही पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक लोकांना घरे सोडावी लागली आहेत आणि पुरामुळे लोकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. दरम्यान, सरकारसह अनेक मोठे सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे येत आहेत.

आम आदमी पक्षाच्या वतीने राज्यसभा खासदार हरभजन सिंग पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. वृत्तानुसार, माजी भारतीय क्रिकेटपटूच्या विनंतीवरून एका संस्थेने पंजाबमधील पीडितांना ३० लाख रुपयांची मदत केली. याशिवाय त्यांचे मित्रही मदतीसाठी पुढे आले आहेत आणि त्यांनी लाखो रुपयांचे दान केले आहे. आतापर्यंत त्यांच्याकडून ५० लाखांहून अधिक रुपयांची रक्कम जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय भज्जीने स्टीमर बोटी आणि रुग्णवाहिका खरेदी करून लाखो रुपये खर्च केले आहेत. स्पष्टपणे, ते मदत करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत.

 

Web Title: Harbhajan singh became a god for the flood victims of punjab he took the initiative to help crores of rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 10:21 AM

Topics:  

  • cricket
  • Harbhajan Singh
  • Sports

संबंधित बातम्या

Photo : वरुण-रेड्डी आऊट, कुलदीप-हर्षित IN; पहिल्या T20 मध्ये अशी असू शकते भारताची प्लेइंग 11
1

Photo : वरुण-रेड्डी आऊट, कुलदीप-हर्षित IN; पहिल्या T20 मध्ये अशी असू शकते भारताची प्लेइंग 11

Women’s World Cup Semi Final : उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका; कोणाचं पारडं जड, वाचा सविस्तर
2

Women’s World Cup Semi Final : उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका; कोणाचं पारडं जड, वाचा सविस्तर

PAK vs SA : पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T20 सामना कधी आणि कुठे पाहायचा? जाणून घ्या संभाव्य Playing 11
3

PAK vs SA : पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T20 सामना कधी आणि कुठे पाहायचा? जाणून घ्या संभाव्य Playing 11

Shreyas Iyer Injury Update : ‘सुर्या दादाने आणखी एकदा मन जिंकलं’, अय्यरच्या दुखापतीबद्दल समजताच केली विचारपुस, दिली हेल्थ अपडेट
4

Shreyas Iyer Injury Update : ‘सुर्या दादाने आणखी एकदा मन जिंकलं’, अय्यरच्या दुखापतीबद्दल समजताच केली विचारपुस, दिली हेल्थ अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.