Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Carrom Tournament : कॅरमच्या पटावर सागर वाघमारे आणि सोनाली कुमारीचा दबदबा! विलिंग्डन जिमखाना स्पर्धेत पटकावले विजेतेपद

Carrom Tournament : विलिंग्डन कॅथलिक जिमखाना कॅरम स्पर्धेत पुण्याच्या सागर वाघमारेने पुरुष एकेरी, तर मुंबईच्या सोनाली कुमारीने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. जाणून घ्या स्पर्धेचा निकाल.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 17, 2026 | 06:30 PM
Carrom Tournament : कॅरमच्या पटावर सागर वाघमारे आणि सोनाली कुमारीचा दबदबा! विलिंग्डन जिमखाना स्पर्धेत पटकावले विजेतेपद

Carrom Tournament : कॅरमच्या पटावर सागर वाघमारे आणि सोनाली कुमारीचा दबदबा! विलिंग्डन जिमखाना स्पर्धेत पटकावले विजेतेपद

Follow Us
Follow Us:
  • पुरुष गटात सागर वाघमारेची बाजी
  • महिला गटात सोनाली कुमारी विजेती
  • 40 वर्षांनंतर जिमखान्यात स्पर्धेचे आयोजन
 

Carrom Tournament : विलिंग्डन कॅथलिक जिमखाना, सांताक्रूझ येथे आयोजित पहिल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुण्याच्या सागर वाघमारे आणि मुंबईच्या सोनाली कुमारी यांनी विजेतेपद पटकावले. पुरुष आणि महिला एकेरी गटातील अंतिम सामने चुरशीचे झाले. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

पुरुष गटात सागर वाघमारेची बाजी

पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या सागर वाघमारेने ठाण्याच्या संदीप दिवे याच्यावर सरळ दोन सेटमध्ये मात केली. सागरने 23-16 आणि 16-12 अशा फरकाने विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावावर केले.
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात मुंबईच्या निलांश चिपळूणकरने बाजी मारली. त्याने मुंबईच्याच सिद्धांत वाडवलकरविरुद्ध पहिला सेट 15-17 असा गमावला. मात्र, त्यानंतर जोरदार पुनरागमन करत पुढील दोन सेट 25-10 आणि 25-9 अशा फरकाने जिंकले.

Gurnoor Brar ला अति आक्रमकपणाचे सेलिब्रेशन नडले; ICC केली ‘ही’ मोठी कारवाई

महिला गटात सोनाली कुमारी विजेती

महिला एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या सोनाली कुमारीने विजेतेपदावर नाव कोरले. मुंबईच्याच मिताली पाठकविरुद्ध झालेल्या तीन सेटच्या लढतीत सोनालीला सुरुवातीला पराभवाचा सामना करावा लागला. मितालीने पहिला सेट 25-10 असा जिंकला. मात्र, सोनालीने दुसऱ्या सेटमध्ये 18-13 आणि तिसऱ्या सेटमध्ये 24-16 अशी बाजी मारत विजेतेपद पटकावले.

या गटातील तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरने रत्नागिरीच्या आकांक्षा कदमचा पराभव केला. समृद्धीने 24-10, 22-25 आणि 24-6 अशा गुणांनी विजय मिळवला.

MS Dhoni IPL Records : नेहमीच चेन्नईसाठी तारणहार ठरलाय एम. एस. धोनी; रेकॉर्ड पहाल तर थक्क व्हालं

40 वर्षांनंतर जिमखान्यात स्पर्धेचे आयोजन

विजेत्या खेळाडूंना विलिंग्डन कॅथलिक जिमखान्याचे अध्यक्ष दीपक नेटो, सचिव रोहिन ग्रेसियस, क्रीडा सचिव आणि ऑलिम्पिक हॉकीपटू जोकीम कार्व्हालो, संयुक्त सचिव आणि ऑलिम्पिक हॉकीपटू मर्विन फर्नांडिस, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष धनंजय साठे, मानद सचिव अरुण केदार आणि मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.

स्पर्धेच्या उत्तम आयोजनाबद्दल दीपक नेटो आणि मर्विन फर्नांडिस यांनी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे कौतुक केले. यापुढेही ही स्पर्धा नियमित आयोजित केली जाईल, असे त्यांनी सांगितले. तब्बल 40 वर्षांनंतर जिमखान्यात या स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाल्याबद्दल अरुण केदार यांनी जिमखान्याच्या संपूर्ण कार्यकारिणीचे आभार मानले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: विलिंग्डन कॅथलिक जिमखाना कॅरम स्पर्धेत पुरुष गटाचे विजेतेपद कोणी पटकावले?

    Ans: पुण्याच्या सागर वाघमारेने पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद पटकावले.

  • Que: महिला एकेरी गटात कोण विजेती ठरली?

    Ans: मुंबईच्या सोनाली कुमारीने महिला एकेरी गटात विजेतेपद मिळवले.

  • Que: स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले होते?

    Ans: मुंबईतील सांताक्रूझ येथील विलिंग्डन कॅथलिक जिमखान्यात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Willingdon catholic gymkhana carrom tournament sagar sonali winners rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • Hockey
  • Sports

संबंधित बातम्या

Hockey Tournament: राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत पुणे विभागाची बाजी; मुलींच्या गटात कोल्हापूरने  पटकावले अव्वल स्थान
1

Hockey Tournament: राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत पुणे विभागाची बाजी; मुलींच्या गटात कोल्हापूरने पटकावले अव्वल स्थान

न्यूमेरोस मोटर्सची खास मोहीम! ऑलिम्पिक तलवारबाज भवानी देवीसह 3 महिला खेळाडूंना ‘N-First’ इलेक्ट्रिक वाहनांची भेट
2

न्यूमेरोस मोटर्सची खास मोहीम! ऑलिम्पिक तलवारबाज भवानी देवीसह 3 महिला खेळाडूंना ‘N-First’ इलेक्ट्रिक वाहनांची भेट

Carrom Championship : सावंतवाडीच्या भरत सावंतचा कॅरममध्ये डंका! प्रल्हाद नलावडे स्मृती चषकावर कोरले नाव
3

Carrom Championship : सावंतवाडीच्या भरत सावंतचा कॅरममध्ये डंका! प्रल्हाद नलावडे स्मृती चषकावर कोरले नाव

Carrom Tournament : 40 वर्षांनंतर विलिंग्डन जिमखान्यात राज्यस्तरीय कॅरमचा थरार; 342 खेळाडूंचा सहभाग
4

Carrom Tournament : 40 वर्षांनंतर विलिंग्डन जिमखान्यात राज्यस्तरीय कॅरमचा थरार; 342 खेळाडूंचा सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.