Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

T-20 वर्ल्ड कपमधून हार्दिक बाहेर; वीरेंद्र सेहवागने निवडलेल्या संघातून पांड्या आऊट; T-20 World Cup 2024 Indian Team

  • By युवराज भगत
Updated On: Apr 24, 2024 | 05:40 PM
Virender Sehwag Plying XI For T20 WC

Virender Sehwag Plying XI For T20 WC

Follow Us
Close
Follow Us:

Virender Sehwag Plying XI For T20 WC : सध्या आयपीएलच्या (IPL 2024) रणसंग्राम सुरू आहे. ऐन मोसमात आलेल्या आयपीएलमध्येच आता टी-20 विश्वचषकाची चर्चा सुरू आहे. तसेच, संघ निवडीसाठी जोरदार चर्चा आहे. त्यातच संघाचे निवडकर्ते अजित आगरकर यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे की, जो आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करेल त्याला निश्चित टी-20 वर्ल्डकप संघात स्थान मिळेल असे सांगितले होते.

विश्वकपमध्ये भारताचा पहिला सामना आयर्लंड विरुद्ध

आता T-20 विश्वचषकाचा ( T20 World Cup) महासंग्राम 2 जून 2024 पासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये T-20 विश्वचषकाचा ( T20 World Cup) थरार रंगणार आहे. भारतीय संघ विश्वचषकाचं अभियान पाच जून रोजी आयर्लंडविरोधात सुरु करणार आहे. त्यानंतर 9 जून रोजी टीम इंडिया पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत (IND vs PAK) भिडणार आहे. टी 20 विश्वचषकात टीम इंडिया कोणत्या प्लेईंग 11 सह मैदानात उतरणार? कोण कोणत्या खेळाडूंना संघात स्थान मिळणार? याबातच्या चर्चा सुरु आहेत. या चर्चा सुरु असतानाच भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सहवाग यानं टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 निवडली आहे.

शानदार कामगिरी कऱणाऱ्यांना संघात स्थान

निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर लवकरच विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड करणार आहेत. आयपीएलमध्ये शानदार कामगिरी कऱणाऱ्यांना संघात स्थान दिलं जाईल, असं अजित आगरकर यांनी आधीच हिंट दिली आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये खेळणाऱ्यांकडे भारतीय चाहत्यांच्या नजरा आहेतच. वीरेंद्र सहवाग यांनी प्लेईंग 11 ची निवड केली आहे. सहवागने निवडलेल्या संघात हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसनला स्थान मिळालं नाही.

वीरेंद्र सहवागच्या संघात कोण कोण?
भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सहवागनं टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 निवडली आहे. सहवागने आपल्या प्लेईंग 11 मध्ये हार्दिक पांड्याला स्थान दिले नाही. त्याशिवाय संजू सॅमसन आणि चहल यांनाही स्थान दिलेले नाही. रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल यांना सलामीसाठी निवडलं आहे. त्यानंतर विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत यासारख्या फलंदाजांना स्थान दिलेय. त्याशिवाय रिंकू सिंह अथवा शिवम दुबे यांच्यापैकी एकाला स्थान देण्याबात सहवागनं सांगितलं आहे. वीरेंद्र सहवागच्या संघात अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा यालाही स्थान मिळालेय. पण हार्दिक पांड्याचा पत्ता कट झालाय.

सहवागने कोणत्या गोलंदाजांवर विश्वास दाखवला
वीरेंद्र सहवागने आपल्या प्लेईंग 11 मध्ये कुलदीप यादव हा एकमेव स्पेशलिस्ट फिरकी गोलंदाज ठेवलाय. वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. बुमराहच्या जोडीला मोहम्मद सिराज आणि संदीप शर्मा यांना स्थान दिले आहे. दरम्यान, यंदाचा विश्वचषकात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमधील मैदानात पार पडणार आहे. दोन जून पासून विश्वचषकाच्या रनसंग्रामाला सुरुवात होणार आहे. सध्या जगभरातील बरेच खेळाडू आयपीएलमध्ये आपला जलवा दाखवत आहे. पुढील काही दिवसांमध्ये टीम इंडियाची प्लेईंग 11 निवडली जाणार आहे.

वीरेंद्र सहवागनं निवडलेली प्लेईंग 11 –
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, रिंकू सिंह/शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, संदीप शर्मा

Web Title: Hardik pandya out of team selected by virender sehwag so hardik out of t 20 world cup indian team nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2024 | 05:40 PM

Topics:  

  • Ajit Agarkar
  • indian team
  • T20 World Cup 2024

संबंधित बातम्या

टीम इंडियाच्या निवड समितीत होणार मोठा बदल! माजी क्रिकेटपटूचे नाव आलं पुढे, BCCI घेणार निर्णय?
1

टीम इंडियाच्या निवड समितीत होणार मोठा बदल! माजी क्रिकेटपटूचे नाव आलं पुढे, BCCI घेणार निर्णय?

BCCI ने दिले अजित आगरकरला दिले मोठे गिफ्ट! 2026 पर्यत करणार भारतीय संघासाठी काम
2

BCCI ने दिले अजित आगरकरला दिले मोठे गिफ्ट! 2026 पर्यत करणार भारतीय संघासाठी काम

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  
3

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  

Asia cup 2025 साठी शुभमन गिलची थेट उपकर्णधारपदी वर्णी; आकडेवारी काही वेगळच सांगते, संघात स्थान देण्यामागील कारण काय?
4

Asia cup 2025 साठी शुभमन गिलची थेट उपकर्णधारपदी वर्णी; आकडेवारी काही वेगळच सांगते, संघात स्थान देण्यामागील कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.