Hardik Pandya will make a comeback : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत अष्टपैलू हार्दिक पंड्याचा समावेश नाही. कारण अष्टपैलू हार्दिक पंड्या आशिया कप दरम्यान दुखापतग्रस्त झाला होता, ज्यामुळे तो पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याला खेळता आले नाही. त्यानंतर, त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी एकदिवसीय आणि टी-२० संघात स्थान मिळाले नाही. आता, त्याच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे की, तो लवकरच बरा होऊन भारतीय संघात परतू शकतो. तथापि, तो सुरुवातीला बेंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये चार आठवडे घालवणार आहे. त्यानंतर त्याच्या संघात परतण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या काळात, ते भारतीय संघासोबत दोन कसोटी मालिका, तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामने खेळणार आहेत. हार्दिक पंड्या ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या मर्यादित षटकांच्या फॉर्मेटमध्ये पुनरागामन करण्याची शक्यता आहे.
एक वृत्तांनुसार, हार्दिकला त्याच्या क्वाड्रिसेप्स दुखापतीसाठी शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही आणि बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या निरीक्षाणाखाली त्याने त्याचे पुनर्वसन सुरू करण्यात आले आहे. ३२ वर्षीय खेळाडूला गेल्या आठवड्यात सीओईमध्ये दाखल करण्यात आले होते परंतु दिवाळीसाठी त्याने ब्रेक घेतला होता. त्याने २२ ऑक्टोबरपासून आता पुन्हा सराव सुरू केला आहे. मागील आठवड्यामध्ये वैद्यकीय पथकाकडून त्याच्या परतीची वेळ निश्चित करण्यात आली होती आणि सुरुवातीच्या मूल्यांकनानुसार तो लवकरच परतू शकतो.
श्रीलंकेविरुद्धच्या आशिया कप सामन्यादरम्यान हार्दिक पंड्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला पाकिस्तानविरुद्धच्या हाय-प्रोफाइल फायनलमध्ये खेळता आले नाही आणि तेव्हापासून संघाचा भाग नाही. तो सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघात उपलब्ध नाही. फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक यांच्याकडून सांगण्यात आले आहे की, त्याची अनुपस्थिती ही एक मोठी हानी आहे.
हेही वाचा : IND vs AUS: किंग कोहलीला 50 वर्षांच्या इतिहासात चालून आली ‘विराट’ संधी! अॅडलेड ODI मध्ये घालणार धुमाकूळ
ते पुढे म्हणाले की हार्दिकसारख्या खेळाडूची अनुपस्थिती ही संघासाठी नेहमीच एक मोठी हानी असते, परंतु सकारात्मक बाजूने, नितीशला काही सामने खेळण्याची संधी मिळत असून आम्ही त्याला विकसित करण्याचा प्रयत्न करत आहोत.