विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)
India vs Australia 2nd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना २३ ऑक्टोबर रोजी अॅडलेड ओव्हल येथे खेळवला जाणार आहे. याया सामन्यात सर्वांच्या नजरा माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीवर असणार आहेत. जो मालिकेच्या पहिल्या सामन्यात भोपळा न फोडताही माघारी गेला होता. तथापि, या ऐतिहासिक मैदानावर विराटच्या प्रभावी कामगिरीमुळे चाहत्यांना त्याच्याकडून जोरदार पुनरागमनाची आशा आहे. जर तो या सामन्यात मोठी खेळी करू शकला तर तो अनेक मोठे विक्रम देख आपल्या नावे करेल.
हेही वाचा : फुटबॉलप्रेमींच्या पदरी निराशा! क्रिस्टियानो रोनाल्डो भारतात येणार नाही; नेमकं कारण काय? वाचा सविस्तर
विराट कोहलीने अॅडलेड क्रिकेट मैदानावर आतापर्यंत १२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ६५ च्या सरासरीने ९७५ धावा केल्या आहेत, ज्यात पाच शतके आहेत. या काळात विराटने एकदिवसीय स्वरूपात दोन आणि कसोटी स्वरूपात तीन शतके केली आहेत. जर त्याने या सामन्यात शतक केले तर त्याला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी मिळेल. त्याच्या शतकासह, तो या मैदानावर सर्वाधिक एकदिवसीय शतके करणारा खेळाडू बनेल. हा विक्रम केवळ ऑस्ट्रेलियन खेळाडूंनाच नाही तर जगभरातील अनेक क्रिकेटपटूंनाही मागे टाकेल. १९७५ पासून अॅडलेड ओव्हलवर एकदिवसीय सामने खेळले जात आहेत, परंतु अद्याप कोणत्याही फलंदाजाने तेथे तीन एकदिवसीय शतके झळकावली नाहीत.
याव्यतिरिक्त, कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठण्याची संधी चालून आली आहे. जर त्याने या एकदिवसीय सामन्यात शतकी खेळी केली. तर तो ऑस्ट्रेलियातील एकाच मैदानावर परदेशी खेळाडू म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके झळकावण्याचा विक्रम आपल्या नावावर करेल. सध्या, विराट कोहली इंग्लंडच्या जॅक हॉब्सशी बरोबरी साधली आहे. ज्याने मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (एमसीजी) वर पाच शतके झळकावण्याची किमया साधली आहे.
विराट कोहलीला आणखी एक ऐतिहासिक कामगिरी पार पाडण्याची संधी आहे. जर विराट कोहलीने या सामन्यात २५ धावा काढल्या तर तो अॅडलेड क्रिकेट ग्राउंडवर १००० आंतरराष्ट्रीय धावा झळकावणारा पहिलाच परदेशी खेळाडू बनू शकतो. सध्या या मैदानावर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा झळकावण्याचा विक्रम देखील विराट कोहलीच्या नावावर जमा आहे.