Harmanpreet Kaur: The thrill of the tri-series ODI series in Sri Lanka from 27th, Harmanpreet Kaur will lead India
Tri-series ODI : आयलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आल्यानंतर, या महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेत सुरू होणाऱ्या एकदिवसीय तिरंगी मालिकेत स्टार फलंदाज हरमनप्रीत कौरकडे पुन्हा एकदा भारतीय महिला संघाचे नेतृत्व दिले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या महिला निवड समितीने २७ एप्रिल ते ११ मे दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची निवड केली आहे. ज्यामध्ये स्मृती मानधना हिची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भारत आणि श्रीलंका व्यतिरिक्त, या स्पर्धेत सहभागी होणारा तिसरा संघ दक्षिण आफ्रिकेचा आहे. डबल राउंड रॉबिन पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेत भारताचा पहिला सामना २७ एप्रिल रोजी श्रीलंकेविरुद्ध होईल. प्रत्येक संघ चार सामने खेळेल आणि अव्वल संघ ११ मे रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील. सर्व सामने कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळले जातील.
हेही वाचा : GT vs RR : गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, आज रंगणार सामना; गिलची सेना करणार सॅमसनसेनेशी दोन हात..
भारतीय संघ पुढीलप्रमाणे हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, काशवी गौतम, स्नेह राणा, अरुंधती रेड्डी, तेजल हबनीस, श्री चरणी, शुची उपाध्याय. INDIA INDIA वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर आणि तीतस साधू जखमी आहेत आणि त्यामुळे त्यांचा निवडीसाठी विचार करण्यात आला नाही, असे बीसीसीआयने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
या संघात काशवी गौतम, श्री चरणी आणि शुची उपाध्याय यांचाही समावेश आहे. या तिघांनी अद्याप कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. डिसेंबर २०२४ मध्ये, वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेदरम्यान हरमनप्रीतला गुडघ्याला दुखापत झाली होती. तथापि, हरमनप्रीतने गेल्या महिन्यात महिला प्रीमियर लीगमध्ये यशस्वी पुनरागमन केले.
हेही वाचा : CSK Vs PBKS: चेन्नईने पूर्ण केला पराभवाचा चौकार; पंजाबने 18 धावांनी जिंकला सामना
पंजाब किंग्सने आपल्या घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केले आहे. पंजाबकडून चेन्नईला १८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. काल आयपीएल २०२५ चा २२ वा सामना पीसीए न्यू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. या स्पर्धेतील पंजाब किंग्सचा हा तिसरा विजय आहे तर चेन्नईचा सलग चौथा पराभव ठरला आहे. आजच्या सामन्यांमध्ये प्रियांश आर्याने संघासाठी कमालीची फलंदाजी करत शतक ठोकले. त्याच्या शतकाच्या जोरावर पंजाब किंगच्या संघाने २१९ धावा उभारल्या. प्रतिउत्तरात मात्र चेन्नई सुपर किंग्स लक्ष्याचा पाठलाग करताना २०१ धावाच करू शकला. परिणामी चेन्नई सुपर किंग्सला १८ धावांनी पराभूत व्हावे लागले.