फोटो सौजन्य - Punjab Kings सोशल मीडिया
Punjab Kings vs Chennai Super Kings match report : पंजाब किंग्सच्या घरच्या मैदानावर पंजबाने चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केले आहे. पंजाबच्या संघाने चेन्नईला 18 धावांनी पराभूत केले आहे. आज आयपीएल २०२५ चा २२ वा सामना पीसीए न्यू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. या पंजाब किंग्स या स्पर्धेमधील तिसरा विजय आहे तर पंजाब किंग्स या स्पर्धेचा तिसरा विजय आहे. आजच्या सामन्यांमध्ये प्रियांश आर्या याने संघासाठी कमालीची फलंदाजी केली, या युवा खेळाडूच्या जोरावर पंजाब किंगच्या संघाने २१९ धावांचे लक्ष्य चेन्नई सुपर किंग्ससमोर लक्ष्य उभे केले होते. त्याचबरोबर शशांक सिंह याने सुद्धा संघासाठी दमदार फलंदाजी केली.
चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने या सामन्यातही विशेष कामगिरी केली नाही. चेन्नईचे सलामीवीर फलंदाज डेव्हॉन कॉन्वे आणि रचिन रवींद्र चांगली सुरुवात करून दिली होती. संघासाठी डेव्हॉन कॉन्वे याने संघासाठी ४९ चेंडूंमध्ये ६९ धावा केल्या, त्यानंतर त्याला संघाने रिटायर आऊट करण्यात आले. रचिन रवींद्र याने या संघासाठी मोठी खेळी खेळली नाही त्याने या सामन्यात २३ चेंडूंमध्ये ३६ धावा केल्या. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आणखी एकदा फेल ठरला. ऋतुराजने संघासाठी ३ चेंडू खेळले आणि १ धाव घेऊन लोकी फर्ग्युसन याने बाहेरचा रस्ता दाखवला.
Shreyas Iyer and his team are back to winning ways with an 18-run victory over CSK! 🙌
Meanwhile, CSK continues to struggle in chasing down 180+ targets. ❌#IPL2025 #PBKSvCSK #Sportskeeda pic.twitter.com/g77N4USm7F
— Sportskeeda (@Sportskeeda) April 8, 2025
चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांची आज पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली आहे. खलील अहमदने संघासाठी २ विकेट्स घेतले तर मुकेश चौधरी याने संघासाठी १ विकेट घेतला. त्याचबरोबर रविचंद्रन अश्विनने संघासाठी २ विकेट्सची कमाई केली. पर्पल कॅप होल्डर नूर अहमदने संघासाठी १ विकेट घेतला.
पंजाब किंग्सच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर प्रभसिमरण सिंह या सामन्यात मोठी कामगिरी करू शकला नाही. प्रियांश आर्याने संघासाठी शतकीय खेळी खेळली आणि त्याच्या जोरावर पंजाब किंग्सच्या संघाला मोठी धावसंख्या उभी करण्यात यश मिळाले. प्रियांशने संघासाठी ४२ चेंडूंमध्ये १०३ धावा केल्या. पंजाबचा कॅप्टन श्रेयस अय्यर या सामन्यांमध्ये त्याने चांगली कामगिरी केली नाही. शंशाकने संघासाठी ३६ चेंडूंमध्ये ५२ धावा केल्या. मार्को जासॅन याने १९ चेंडूंमध्ये ३४ धावा केल्या.
या पराभवासह चेन्नईच्या संघाने सलग चार पराभवाना सामोरे जावे लागले आहे. तर पंजाब किंग्सने ३ विजय नावावर केले आहेत.