Women's World Cup 2025: 'Two bad matches are important...', Harmanpreet Kourne's statement is in the news after the defeat against Australia..
India Women vs Australia Women : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकातील १३ व्या सामन्यात भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा तीन विकेटने पराभव केला आहे. रविवारी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मोठ्या धावसंख्येचा आणि रोमांचक सामना पार पडला. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने विक्रमी धावांचा पाठलाग करत हा सामना आपल्या नावे केला.
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकात भारतीय महिला संघाचा हा सलग दुसरा पराभव ठरला आहे. ऑस्ट्रेलियाच्या पराभवापूर्वी भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध देखील पराभव स्वीकारावा लागला आहे. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर पराभवानंतर निराश झाल्याचे दिसून आली. तथापि, तिने तिच्या संघाचे मनोबल उंचाववण्याचे काम केले.
हेही वाचा : Ind vs WI : जॉन कॅम्पबेलने दिल्ली जिंकली! विवियन रिचर्ड्स आणि कपिल देव या दिग्गज जोडीच्या यादीत झाला सामील…
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर हरमनप्रीत कौरने प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली की, दोन वाईट सामने महत्त्वाचे नाहीत. आम्ही भविष्यातील सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन करून दमदार पुनरागमन करू, असे कौरने म्हटले आहे. सामन्यानंतर हरमनप्रीत कौर म्हणाली की, “आम्ही ज्या पद्धतीने सुरुवात केली होती, त्यामुळे आम्हाला ३०-४० धावा अधिक करता आल्या असत्या, पण शेवटच्या ६-७ षटकांत यांच्या विकेट जात राहिल्या. फलंदाजीसाठी ही चांगली विकेट असली तरी आम्ही त्याचा फायदा घेऊ शकलो नाही.”
हरमनप्रीत कौर पुढे म्हणाली की, ‘सलामीवीरांनी आम्हाला चांगली सुरुवात दिली होती. म्हणूनच आम्ही खूप धावा काढत आहोत. गेल्या तीन सामन्यांमध्ये आम्हाला मधल्या षटकांमध्ये फलंदाजी करता आलेली नाही. खालच्या फळीने जबाबदारी घेतली, पण आज आम्हाला शेवटी चांगली कामगिरी करता आलेली नाही. पुढील काही सामने आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत आणि या सामन्याने अनेक सकारात्मक बाबी आणल्या जातील. आम्ही बसून त्यावर चर्चा करू. या संयोजनाने आम्हाला भूतकाळात यश मिळवून दिले असून दोन वाईट सामने महत्त्वाचे नाहीत. आम्ही पुढील सामन्यांमध्ये पुनरागमन करू.” असे मत हरमनप्रीत कौरने व्यक्त केले.
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकामध्ये भारताचा हा सलग दुसरा पराभव ठरला आहे. मागील म्हणजे भारताच्या तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा ३ विकेट्सने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध विक्रमी विजय मिळवला आहे. या सामन्यापूर्वी महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात कधीही ३३१ धावांचा पाठलाग करण्यात आलेला नव्हता. परंतु भारताच्या ३३० धावांचा ऑस्ट्रेलियाने यशस्वी पाठलाग केला आणि विजय मिळवला. आता, उपांत्य फेरीत टिकून राहण्यासाठी भारताला सर्व सामने जिंकावे लागतील.
हेही वाचा : IND vs WI : फॉलो-ऑन मिळाल्यानंतर भारताने कधी केली होती फलंदाजी? रवींद्र जडेजाचे देखील पदार्पण झाले नव्हते