जॉन कॅम्पबेल(फोटो-सोशल मीडिया)
John Campbell joins special list : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दूसरा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियवर खेळला जात आहे. या समान्यत जॉन कॅम्पबेलने १९९ चेंडूत ११५ धावा केल्या आहेत. कॅम्पबेलचे हे पहिले कसोटी शतक असून त्याने रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर षटकार मारून आपले शतक पूर्ण केले.
दुसऱ्या कसोटीतील सामन्यातील शतकासह, कॅम्पबेलने एलिट यादीत प्रवेश मिळवला आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आपले पहिले कसोटी शतक करणारा तो १७ वा खेळाडू ठरला आहे. हे तेच स्टेडियम आहे जिथे वेस्ट इंडिजचे दिग्गज फलंदाज विवियन रिचर्ड्स आणि भारताचे विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी शतके थोकण्याची किमया साधली होती. कॅम्पबेल आता या दिग्गजांच्या यादीत सामील झाला आहे.
हेही वाचा : IND vs WI : ‘तुम्हाला माहिती आहे तर तो… ‘, जेव्हा जसप्रीत बुमराहने हसून पंचांना अपील केली, पहा Video
क्रिकबझच्या मते, जॉन कॅम्पबेल दिल्लीत आपले पहिले कसोटी शतक झळकावणारा १७ वा खेळाडू ठरला आहे. यामध्ये उल्लेखनीय म्हणजे, या १७ खेळाडूंपैकी सहा खेळाडू हे वेस्ट इंडिजचे आहेत. भारतातील इतर कोणत्याही मैदानाच्या तुलनेत दिल्ली हे असे मैदान आहे जिथे सर्वाधिक खेळाडूंनी त्यांचे पहिले कसोटी शतक ठोकली आहेत. कॅम्पबेलपूर्वी, दिल्लीमध्ये शेवटचे शतक ठोकणारे फलंदाज नयन मोंगिया आहेत, ज्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५२ धावा काढल्या होत्या.
वेस्ट इंडिजचा जॉन कॅम्पबेलने त्याच्या ४८ व्या डावात पहिले कसोटी शतक झळकावून एक खास कामगिरी केली आहे. कसोटी इतिहासामध्ये सलामीवीराने पहिले कसोटी शतक गाठण्यासाठी घेतलेले हे दुसरे सर्वाधिक डाव ठरले आहेत. कॅम्पबेल दक्षिण आफ्रिकेच्या ट्रेवर गोडार्डच्या विश्वविक्रमापासून जास्त दूर नाही, ज्याने त्याच्या ५८ व्या डावात पहिले कसोटी शतक झळकावले होते.
जॉन कॅम्पबेलने शतक झळकावून एक मोठा टप्पा पार केला आहे.भारतात तो १९ वर्षांत सलामीवीर म्हणून शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. २०२३ नंतर कसोटीत शतक झळकावणारा पहिला सलामीवीर देखील ठरला आहे. कॅम्पबेलपूर्वी, डॅरेन गंगाने भारताविरुद्ध सलामीवीर म्हणून वेस्ट इंडिजसाठी शतक लगावले होते. २२ ते २६ जून २००६ दरम्यान खेळवण्यात आलेल्या बासेटेरे कसोटीच्या पहिल्या डावात गंगाने ब्रायन लाराच्या नेतृत्वाखालील संघासाठी २९४ चेंडूत १३५ धावा फटकावल्या होत्या.