
Hong kong Sixes : सलग तीन पराभवानंतर भारताला सूर गवसला! बांगलादेशला 5 विकेट्सने नमवले
हाँगकाँग सिक्सेस ( Hong kong Sixes)मध्ये सलग तीन पराभवानंतर भारतीय संघाला अखेर पहिला विजय प्राप्त करता आला. मिशल रोड ग्राउंडमध्ये रविवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा अखेरच्या चेंडूवर पाच विकेटने पराभव केला.
भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 6 ओव्हर्समध्ये 5 बाद 116 धावा केल्या. कर्णधार अबू हिदर रोनीने 18 चेंडूंत 8 सिक्स व 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 62 धावा केल्या. त्याच्याशिवाय हबीबुर रहमान सोहनने 6 चेंडूंवर 18, सब्बीर रहमानने 4 चेंडूंत 13 आणि चौधरी मोहम्मद रिझवानने 5 चेंडूंत 12 धावांचे योगदान दिले.
भारताच्या वतीने कर्णधार कृणाल पंड्या सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 2 ओव्हर्समध्ये 25 धावा देत 3 विकेट घेतल्या. राहुल त्रिपाठीला एक विकेट मिळाली.
117 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारत शेवटच्या चेंडूपर्यंत खेळ दाखवला. शशांक सिंहने 15 चेंडूंत 7 सिक्स
आणि 1 चौकारच्या मदतीने 50 धावांची खेळी केली. तो दुर्दैवाने रिटायर्ड हर्ट झाला. राहुल त्रिपाठीने 12 चेंडूंत 3 सिक्स व 3 चौकारांच्या मदतीने 32, नितीश राणाने 4 चेंडूंत नाबाद 10 आणि राहुल तेवतियाने 5 चेंडूंत नाबाद 16 धावांचे योगदान दिले. कृणाल पंड्याला प्लेयर ऑफ द मॅच घोषित करण्यात आले.
भारताला ‘सी’ गटात ठेवण्यात आले असून त्यांना पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून 4 विकेटने, दुसऱ्या सामन्यात युएईकडून 6 विकेटने आणि तिसऱ्या सामन्यात इंग्लंडकडून 3 विकेटने पराभवाचा सामना करावा लागला. स्पर्धेत 12 संघांनी भाग घेतला असून रविवारी बांगलादेशवरील विजयानंतर भारत गुणतालिकेत 11 व्या स्थानी पोहचला आहे.
या भारतीय संघात आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंचा भरणा असतानाही आतापर्यंत त्यांची कामगिरी म्हणावी तशी चांगली राहिलेली नाही. त्यांना चक्क कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागल्याने या स्पर्धेच्या तयारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
Ans: भारतीय संघाने बांगलादेशचा अखेरच्या चेंडूवर 5 विकेट्सने पराभव केला.
Ans: सलग तीन पराभवांनंतर रविवारी बांगलादेशविरुद्ध भारताने स्पर्धेतील पहिला विजय मिळवला.
Ans: शशांक सिंहने अवघ्या 15 चेंडूंत 50 धावांची आक्रमक खेळी केली. यात त्याने सात षटकार आणि एक चौकार लगावला.