ICC Annual General Meeting! Test and T20 cricket likely to be discussed; 'This' hint received
ICC Annual General Meeting : आयसीसीची वार्षिक सर्वसाधारण सभेला गुरुवारपासून सुरवात होणार आहे. ही सभा चार दिवास चालणार आहे. या चार दिवसांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. या सभेमध्ये द्विस्तरीय कसोटी प्रणाली, टी-२० विश्वचषकाचा विस्तार आणि नवीन सदस्यांची स्वीकृती आणि क्रिकेटला देण्यात येणारे प्रोत्साहन यासारख्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होणार आहे. त्याच वेळी, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे नवीन चक्र सुरू झाले असून त्याबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
जूनमध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद (२०२५-२७) चे नवीन सायकल सुरु झाली आहे. यासह, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेटबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. आता कसोटी क्रिकेट दोन स्तरांमध्ये विभागण्यात यावे याबाबत चर्चा आहे. ज्यामध्ये एक टॉप लीग आणि एक लोअर लीग असणार आहे. या संभाव्य प्रणालीमध्ये निधीचे पुनर्वितरण, पदोन्नती आणि रेलीगेशन सारख्या तरतुदींचा समावेश असण्याची शक्यता आहे. म्हणजेच, खालच्या लीगमधील संघांना चांगली कामगिरी करण्यासाठी पुढे आणण्यास मदत होणार आहे.तर वरच्या लीगमधील कमकुवत संघांना खाली पाठवता येणार.
हेही वाचा : IND Vs ENG : ‘आयसीसीने आकारलेला दंड मजेदार..’, डीएसपी सिराजच्या शिक्षेवर ‘या’ इंग्लिश दिग्गज खेळाडूचा संताप…
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सायकलमध्ये कोणताही बदल होणार नाही. यावर क्रिकेट बोर्डांमध्ये एकमत असले तरी, ही नवीन प्रणाली २०२७ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीनंतर लागू केली जाऊ शकते. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह आणि नवनियुक्त सीईओ संजोग गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या पद्धतीचा विचार करण्यात येणार आहे, कारण क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड हे त्याचे प्रमुख पाठीराखे आहेत.
T20 विश्वचषकात आणखी चार नवीन संघ सामील होण्याची शक्यता आहे. याबाबत आयसीसी विचार करत आहे, ज्यामुळे संघांची संख्या २४ पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तथापि, यावर अंतिम निर्णय २०२६ पूर्वी घेण्यात येणार नाही. सध्या या स्पर्धेत २० संघ खेळत आहेत. इटलीची पात्रता क्रिकेटच्या विस्ताराचे लक्षण म्हणून पाहण्यात येत आहे. त्याच वेळी, ५० षटकांच्या विश्वचषकात संघांच्या संख्येत कोणता देखील बदल होणार नाही. आयसीसीचे मत आहे कि, सध्याचा फॉरमॅट सध्या संतुलित आहे.
ही चार दिवशीय वार्षिक सर्वसाधारण सभा आयसीसीचे अध्यक्ष जय शाह आणि नवे सीईओ संजोग गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. जय शाह यांच्या नेतृत्वाखाली आयसीसी क्रिकेटला ऑलिंपिकसारख्या मोठया जागतिक व्यासपीठांवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यांनी अलीकडेच फिफा आणि ऑलिंपिकच्या उच्च अधिकाऱ्याची भेट घेतली आहे. त्याच वेळी, झांबिया आयसीसीमध्ये असोसिएट सदस्य म्हणून परत येण्याची शक्यता आहे. तर पूर्व तिमोर पहिल्यांदाच आयसीसीचे सदस्य होण्याच्या जवळपास आहे.
२०२४ मध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी२० विश्वचषकामध्ये खर्चात अनियमिततेचे आरोप करण्यात आले होते. या प्रकरणाचा चौकशी अहवाल एजीएममध्ये सादर केला जाण्याची शक्यता आहे. या वादामुळे माजी सीईओ जेफ अलार्डाईस यांनी राजीनामा दिल्याचे बोलेले जात आहे.