IND vs ENG : भारत आणि इंग्लड यांच्यात पाच सामन्यांच्या ककसोटी मालिकेत इंग्लंडने २-१ अशी आघाडी घेतली आहे. नुकताच इंग्लंडने लॉर्ड्सवरील रोमांचक सामन्यात भारताचा २२ धावांनी पराभव केला. इंग्लंडने लॉर्ड्सवर विजय संपादन केला असला तरी देखोल त्यांना त्याचा फायदा न होता फाटकाच बसला आहे. आम्ही तुम्हाला २०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सांगत आहोत. लॉर्ड्स कसोटीतील विजयानंतर दोन दिवसांनी आयसीसीकडून इंग्लंड संघाला मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्यात लॉर्ड्सवर इंग्लंडने भारताविरुद्ध २२ धावांनी रोमांचक विजय मिळवला. परंतु, या सामन्यादरम्यान इंग्लंडने स्लो ओव्हर रेट राखल्याची किंमत त्यांना मोजावी लागली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमधून इंग्लंडचे दोन पॉइंट कापण्यात आले आहेत. त्यासोबत संघाला त्यांच्या सामना शुल्काच्या १० टक्के दंडही ठोठावण्यात आला आहे.
हेही वाचा : IND VS ENG : WTC points table मध्ये भारताला मोठा झटका! इंग्लंड संघाची दुसऱ्या स्थानावर मुसंडी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून सांगण्यात आले आहे की, खेळाडू आणि खेळाडू सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठीच्या आचारसंहितेच्या कलम २.२२ अंतर्गत इंग्लंडला त्यांच्या सामन्याच्या फीच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे, जो किमान ओव्हर-रेट गुन्ह्यांशी निगडित आहे. त्यानुसार, निर्धारित वेळेत गोलंदाजी न केल्यास, प्रत्येक षटकासाठी खेळाडूच्या सामना शुल्काच्या पाच टक्के दंड आकारण्यात येतो. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळण्याच्या अटींच्या कलम १६.११.२ नुसार, जर एखादा संघ निर्धारित वेळेत गोलंदाजी करू शकला नाही, तर वेळेचा विचार करता प्रत्येक षटक कमी करण्यासाठी एक गुण वजा करण्यात येतो.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सकडून आहे गुन्हा कबूल करण्यात आला आहे. यासोबतच रिची रिचर्डसन यांनी त्यांनी लावण्यात आलेला प्रस्तावित दंडही स्वीकारला आहे. अशा परिस्थितीत औपचारिक सुनावणीची आवश्यकता नसल्याचे आयसीसीकडून सांगण्यात आले. मैदानावरील पंच पॉल रीफेल आणि शराफुद्दुल्लाह इब्ने शाहिद, तिसरे पंच अहसान रझा आणि चौथे पंच ग्राहम लॉईड यांनी हे आरोप केले होते.
लॉर्ड्स कसोटीत स्लो ओव्हर-रेटसाठी दोषी आढळल्यानंतर इंग्लंड संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप क्रमवारीतील गुण २४ वरून २२ पर्यंत घसरले आहेत. यामुळे, त्याचे गुण टक्केवारी ६६.६७ वरून ६१.११ पर्यंत कमी झाली आहे. परिणामी, इंग्लंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.
हेही वाचा : ICC Test batsmen rankings : जो रूट पुन्हा अव्व्लस्थानी, भारतीय खेळाडूंची क्रमवारीत घसरगुंडी…
श्रीलंका संघाने इंग्लंड संघाला मागे टाकले आहे आणि ते दुसऱ्या स्थानावर आले आहे. ऑस्ट्रेलिया संघ सध्या पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर विराजमान आहे. भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर आहे.
लॉर्ड्सवरच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात, पहिल्या डावात बरोबरी झाल्यानंतर इंग्लंडने भारतासमोर १९३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. रवींद्र जडेजाने नाबाद ६१ धावा करून झुंझ देऊन संघाला विजयाकडे नेण्याचा प्रयत्न केला, परंतु धावसंख्या १७० पर्यंतच पोहचू शकली. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने २-१ अशी आघाडी घेतली आहे.