Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रीलंकेच्या विजयावर ICC ने फिरवलं पाणी, ‘स्लो ओव्हर रेट’मुळे सर्व ११ खेळाडूंना शिक्षा

झिम्बाब्वे विरुद्धची वनडे मालिका जिंकूनही श्रीलंकेच्या संघावर ICC ने कारवाई केली आहे. 'स्लो ओव्हर रेट'च्या नियमाचे उल्लंघन केल्याने सर्व ११ खेळाडूंच्या मानधनात कपात करण्यात आली आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण काय आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 01, 2025 | 04:14 PM
श्रीलंकेच्या विजयावर ICC ने फिरवलं पाणी, ‘स्लो ओव्हर रेट’मुळे सर्व ११ खेळाडूंना शिक्षा
Follow Us
Close
Follow Us:
  • श्रीलंकेच्या विजयावर ICC ने फिरवलं पाणी
  • ‘स्लो ओव्हर रेट’मुळे सर्व ११ खेळाडूंना शिक्षा
  • श्रीलंकेच्या खेळाडूंना शिक्षा का झाली?
झिम्बाब्वे आणि श्रीलंका यांच्यात नुकत्याच झालेल्या दोन वनडे सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेने यजमान झिम्बाब्वेला २-० ने पराभूत करून मालिका जिंकली. मात्र, हा विजय साजरा करण्यापूर्वीच श्रीलंकेच्या संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मोठा झटका दिला आहे. ‘स्लो ओव्हर रेट’ च्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ICC ने संघातील सर्व ११ खेळाडूंना कठोर शिक्षा सुनावली आहे. या खेळाडूंनी ही शिक्षा स्वीकारली आहे.

श्रीलंकेच्या खेळाडूंना शिक्षा का झाली?

पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेने ७ धावांनी विजय मिळवला होता. मात्र याच सामन्यात श्रीलंकेच्या खेळाडूंनी ‘स्लो ओव्हर रेट’ नियमाचे उल्लंघन केले. त्यांनी निर्धारित वेळेत एक षटक कमी टाकले. त्यामुळे, ICC ने त्यांच्या आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार श्रीलंका क्रिकेट संघाला दोषी ठरवले. यानुसार, सर्व श्रीलंकेच्या खेळाडूंच्या मॅच फीमधून ५ टक्के रक्कम कापण्यात आली आहे. या प्रकरणात औपचारिक सुनावणीची गरज भासली नाही, कारण श्रीलंकेचा कर्णधार चरित असलंका याने गुन्हा मान्य केला आणि सुनावलेली शिक्षाही स्वीकारली.

Sri Lanka hold their nerves in a thrilling finish to go 1-0 up in the ODI series against Zimbabwe 🙌#ZIMvSL 📝: https://t.co/g9G0zQleHm pic.twitter.com/eXcnmVXoLx — ICC (@ICC) August 29, 2025

हे देखील वाचा: ICC Women’s World Cup मध्ये विजेत्यासह ‘हे’ संघही होणार मालामाल! होणार कोट्यवधी रुपयांचा वर्षाव.. 

मालिका अशी झाली

पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेने ५० षटकांत ६ गडी गमावून २९८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वेचा संघ ५० षटकांत ८ गडी गमावून २९१ धावाच करू शकला, ज्यामुळे श्रीलंकेने ७ धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या वनडेमध्ये झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना २७७/७ धावा केल्या. श्रीलंकेने हे आव्हान ५ गडी राखून सहज पूर्ण केले आणि मालिका २-० अशी जिंकली.

आता टी-२० मालिका

दोन सामन्यांची वनडे मालिका संपल्यानंतर आता झिम्बाब्वे आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ३ सप्टेंबर रोजी, दुसरा सामना ६ सप्टेंबर रोजी आणि तिसरा सामना ७ सप्टेंबर रोजी खेळला जाईल.

Web Title: Icc changes the tide on sri lankas victory punishes all 11 players for slow over rate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 04:14 PM

Topics:  

  • cricket sports
  • ICC
  • Sports News
  • Sri Lanka cricket

संबंधित बातम्या

देवाने संधी दिली तर…; विराट कोहलीबद्दल नवज्योतसिंग सिद्धू यांनी व्यक्त केली ‘ही’ इच्छा; चाहतेही झाले भावुक
1

देवाने संधी दिली तर…; विराट कोहलीबद्दल नवज्योतसिंग सिद्धू यांनी व्यक्त केली ‘ही’ इच्छा; चाहतेही झाले भावुक

विश्वास बसणार नाही पण खरंय! मैदानात झेल घेणारा चाहता झाला मालामाल; बक्षीसाची रक्कम ऐकून थक्क व्हाल
2

विश्वास बसणार नाही पण खरंय! मैदानात झेल घेणारा चाहता झाला मालामाल; बक्षीसाची रक्कम ऐकून थक्क व्हाल

U19 World Cup : १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर! आयुष म्हात्रे करणार सारथ्य; ‘या’ खेळाडूंची लागली लॉटरी 
3

U19 World Cup : १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर! आयुष म्हात्रे करणार सारथ्य; ‘या’ खेळाडूंची लागली लॉटरी 

IND W vs SL W 3rd T2OI: शेफालीची फटकेबाजी अन् दीप्तीची फिरकी; भारताने श्रीलंकेला ८ विकेट्सनी लोळवलं, मालिका केली नावावर
4

IND W vs SL W 3rd T2OI: शेफालीची फटकेबाजी अन् दीप्तीची फिरकी; भारताने श्रीलंकेला ८ विकेट्सनी लोळवलं, मालिका केली नावावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.