Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेटमध्ये बदलाचे वारे! ICC घेणार ‘हे’ मोठे निर्णय; सामन्याच्या मध्यात बदलणार चेंडूचा रंग, काय असणार नवे नियम?

ICC New Rules: आयसीसी क्रिकेटच्या कसोटी, वनडे आणि T-20 फॉरमॅट्सच्या नियमांमध्ये नवीन बदल करण्याच्या तयारीत आहे. ३० मे रोजी अहमहाबाद येथे आयसीसीची बैठक होणार आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 23, 2026 | 06:15 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Close
Follow Us:
  • मध्य सामन्यात चेंडूचा रंग बदलणार ?
  • वनडे आणि टी-20 सामने होणार आणखी थरारक
  • ICCचा नवा नियम चर्चेत
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) क्रिकेटच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्याचा तयारीत आहे. हे बदल कसोटी, वनडे आणि T-20 या तिन्ही फॉरमॅट्सना लागू होऊ शकतात. विशेष म्हणजे, एकाच फॉरमॅटमध्ये वेगवेगळ्या रंगांच्या चेंडूंचा वापर हा सर्वात मोठा बदल असू शकतो. आयसीसी वेळोवेळी क्रिकेटच्या नियमांमध्ये सुधारणा करते. या नियामंवर सध्या चर्चा केली जात आहे. सविस्तर चर्चेनंतरच त्यांची अंमलबजावणी केली जाईल. तसेच, एकदिवसीय क्रिकेटमध्ये मुख्य प्रशिक्षकासंबंधीचे काही नियमही बदलले जाऊ शकतात, तर टी-२० क्रिकेटमधील डावाच्या विश्रांतीची वेळही कमी केली जाऊ शकते. ३० मे रोजी अहमदाबाद येथे होणाऱ्या आयसीसी बोर्डाच्या बैठकीत या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यास, हे नवीन नियम लवकरच लागू केले जाऊ शकतात.

PBKS vs LSG: लखनौच्या मैदानावर फलंदाज की गोलंदाज भारी पडणार? खेळपट्टी कोणाच्या बाजूने? वाचा पिच रिपोर्ट

मुख्य प्रशिक्षकांच्या नियमांतही बदल

क्रिकबझच्या एका वृत्तानुसार, आयसीसी एकदिवसीय सामन्यांच्या नियमांमध्येही बदल करू शकते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मुख्य प्रशिक्षकासंदर्भात नवीन नियम लागू केले जाऊ शकतात. सध्याच्या नियमांनुसार, ड्रिंक्स ब्रेकच्या वेळी मुख्य प्रशिक्षकाला मैदानावर येण्याची परवानगी नाही. केवळ बदली खेळाडूंनाच मैदानावर येण्याची परवानगी असते. यात बदल केला जाऊ शकतो आणि रणनीती आखण्याच्या उद्देशाने प्रशिक्षकाला मैदानावर येण्याची परवानगी दिली जाऊ शकते. तसेच, जेव्हा एखादा खेळाडू ड्रिंक्स घेऊन मैदानावर येतो, तेव्हा त्याला एक विशिष्ट जर्सी घालणे बंधनकारक असते. टी-२० सामन्यांमध्ये, ब्रेक दरम्यान प्रशिक्षकांना मैदानात येण्याची आधीच परवानगी आहे.

कसोटीमध्ये चेंडूचा रंग बदलू शकतो

आयसीसी कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वात मोठा बदल करू शकते. एका कसोटी सामन्यादरम्यान लाल चेंडूऐवजी गुलाबी चेंडू वापरला जाऊ शकतो. जर खराब हवामान किंवा अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे सामना थांबला, तर दोन्ही संघांच्या संमतीने फ्लडलाइट्सच्या प्रकाशात गुलाबी चेंडू वापरून सामना पुन्हा सुरू केला जाऊ शकतो.

टी-२० इनिंग्ज ब्रेकमध्ये बदल

आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील डावांच्या विश्रांतीसाठी म्हणजेच इनिंग्ज ब्रेकमध्ये दिला जाणारा वेळ कमी करू शकते. जर नवीन नियम लागू झाला, तर दोन डावांमधील विश्रांतीचा वेळ २० मिनिटांवरून १५ मिनिटांपर्यंत कमी केला जाईल. याचा अर्थ संघांना विश्रांती घेण्यासाठी आणि पुढील डावासाठी रणनीती आखण्यासाठी पाच मिनिटे कमी मिळतील.

पंच गोलंदाजी अॅक्शनवर ठेवणार लक्ष

गोलंदाजांना चुकीच्या किंवा बेकायदेशीर बॉलिंग अॅक्शन (चकिंग) करण्यापासून रोखण्यासाठी, थेट सामन्यांदरम्यान मैदानातील पंचांना हॉकआय तंत्रज्ञानामधून मिळालेला डेटा पाहण्याची परवानगी दिली जाऊ शकते. पंच आता सामन्यांदरम्यान बेकायदेशीर अॅक्शन वापरणाऱ्या गोलंदाजांना अपात्र ठरवू शकतात.

Rajat Patidar: रजत ‘रॉकेट’ पाटीदार! IPL चा नवा सिक्सर किंग; ख्रिस गेलही पडला फिका

Web Title: Icc new cricket rules pink ball test match t20 innings break odi coach rule changes 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • BCCI India
  • cricket marathi news
  • ICC

संबंधित बातम्या

IPL 2026: KKR च्या विजयाने प्लेऑफच्या शर्यतीत मोठा ट्विस्ट, बदलले पॉईंट टेबलचे गणित; टॉप-4 साठी चुरस वाढली
1

IPL 2026: KKR च्या विजयाने प्लेऑफच्या शर्यतीत मोठा ट्विस्ट, बदलले पॉईंट टेबलचे गणित; टॉप-4 साठी चुरस वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.