
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये एकदिवसीय मालिका पार पडली या मालिकेमध्ये भारताचा पराभव झाला त्यामुळे भारताने मालिका गमावली. पण या मालिकेमध्ये भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने पाच महिन्यानंतर संघामध्ये पुनरागमन केले आणि दमदार फलंदाजी केली. भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शानदार शतक झळकावले त्याचबरोबर त्याने दुसऱ्या सामन्यामध्ये त्याने अर्धशतक देखील झळकावले त्याने त्याच्या खेळीने स्वत: ला आणखी एकदा सिद्ध केले.
भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा पहिल्यांदाच आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत नंबर वन वनडे फलंदाज बनला आहे. त्याने वयाच्या ३८ व्या वर्षी ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली. रोहितने एकदिवसीय कर्णधार शुभमन गिलला मागे टाकत जगातील नंबर वन वनडे फलंदाज बनला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अलिकडच्या एकदिवसीय मालिकेत माजी भारतीय कर्णधार रोहितने एकूण २०२ धावा केल्या. या काळात त्याची सरासरी १०१ होती, ज्यामध्ये अंतिम सामन्यातील नाबाद शतकाचा समावेश होता.
या सामन्यातील भारताच्या विजयासह, रोहितला मालिकावीर आणि सामनावीर पुरस्कार मिळाले. रोहितचे ७८१ रेटिंग गुण आहेत, तर गिल दोन स्थानांनी घसरून तिसऱ्या स्थानावर आला आहे. त्याचे रेटिंग गुण ७४५ आहेत. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताचे नेतृत्व करणारा रोहित (रोहित शर्मा आयसीसी रँकिंग) सचिन तेंडुलकर , महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि गिल यांच्यानंतर जगातील नंबर १ वनडे फलंदाज बनणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे . त्याने भारताचा नवा कर्णधार शुभमन गिलला मागे टाकले .
India great takes the No.1 spot for the very first time in the ICC Men’s ODI Player Rankings 🤩 Read more ⬇️https://t.co/4IgBu2txdo — ICC (@ICC) October 29, 2025
गिल आता पहिल्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये तो फक्त १०, ९ आणि २४ धावा करू शकला. ३८ वर्षे आणि १८२ दिवसांच्या वयात, रोहित आयसीसी पुरुषांच्या एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचणारा सर्वात वयस्कर फलंदाज बनला आहे , त्याने त्याच्या कारकिर्दीत प्रथमच हा पराक्रम केला आहे . भारताचा दिग्गज सचिन तेंडुलकर हा ३८ वर्षांच्या वयानंतर यादीत अव्वल स्थान मिळवणारा एकमेव फलंदाज आहे. सचिनने २०११ मध्ये कसोटी स्वरूपात ही कामगिरी केली होती .