Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women’s T20 bowling rankings : दीप्ती शर्माच्या स्थानाला मोठा धक्का! पाकिस्तानी खेळाडू टी-२० मध्ये अव्वल स्थानी 

आयसीसीकडून जाहीर करण्यात आलेल्या महिला टी-२० क्रमवारीमध्ये भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माला मोठा धक्का बसला आहे. दीप्ती शर्मा पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जाऊन घसरली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 17, 2026 | 05:32 PM
Women's T20 bowling rankings: Deepti Sharma's position suffers a big blow! Pakistani player tops T20 rankings;

Women's T20 bowling rankings: Deepti Sharma's position suffers a big blow! Pakistani player tops T20 rankings;

Follow Us
Close
Follow Us:

Women’s T20 bowling rankings : आयसीसीकडून ताजी रँकिंग जाहीर करण्यात आली आहे. महिला टी-२० क्रमवारीमध्ये भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माला मोठा धक्का बसला आहे. दीप्ती शर्मा पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरली आहे. दरम्यान, पाकिस्तानी डावखुरी फिरकी गोलंदाज सादिया इक्बालने शानदार कामगिरी करत  टी-२० गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानावर उडी मारली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अलिकडच्या टी-२० मालिकेत सादिया इक्बालने शानदार प्रदर्शन केले आहे. ३० वर्षीय या खेळाडूने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांमध्ये एकूण पाच विकेट्स घेतल्या, ज्यामध्ये एकाच डावात फक्त १८ धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या होत्या. या कामगिरीच्या जोरावर सादिया इक्बालने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज अ‍ॅनाबेल सदरलँड आणि अनुभवी भारतीय फिरकी गोलंदाज दीप्ती शर्मा यांना मागे टाकत दोन स्थानांची झेप घेतली.

हेही वाचा : IND W vs AUS W : भारतीय महिला संघात प्रतिका रावलची एंट्री! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी एकदिवसीय मालिकेत लागली वर्णी

सादिया इक्बाल अव्वल स्थानी

सदरलँडने मागील महिन्यात फक्त नंबर १ रँकिंग मिळवले होते, परंतु इक्बालच्या सातत्यपूर्ण कामगिरी आणि सामना जिंकणाऱ्या गोलंदाजीमुळे ती आता पुन्हा अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे. ताज्या रँकिंग अपडेटमध्ये पाकिस्तान संघासाठी आणखी चांगली बातमी समोर आली आहे.

फातिमा सनाच्या रँकिंगमध्ये सुधारणा

मालिकेच्या शेवटच्या सामन्यात अष्टपैलू कामगिरी बजावल्यानंतर कर्णधार फातिमा सनाने अनेक श्रेणींमध्ये लक्षवेधक सुधारणा केली आहे. २४ वर्षीय ही खेळाडू टी-२० फलंदाजी क्रमवारीत ३१ स्थानांची झेप घेऊन २८ व्या स्थानी पोहचली आहे. तसेच महिला टी-२० क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत देखील ती पाच स्थानांनी पुढे सरकली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात फातिमा सनाने ४७ धावांची खेळी केली. या उत्कृष्ट कामगिरीसाठी तिला सामनावीर पुरस्कराने सन्मानीत करण्यात आले. मालिकेत सनाने ९०, ९ आणि ४७* धावा काढल्या आणि दोन विकेट्स चटकावल्या. त्यामुळे तिला मालिकावीर म्हणून देखील गौरवण्यात आले.

हेही वाचा :इम्रान खानची अवस्था वाईट! गावस्कर आणि कपिल देवसह 14 माजी क्रिकेटपटूंचे शाहबाज शरीफ यांना पत्र; वाचा सविस्तर

रेणुका सिंगची मोठी झेप

गोलंदाजांच्या यादीत इंग्लंडची सोफी एक्लेस्टोनला एका स्थानाचा फायदा होऊन तिसऱ्या स्थानावर येऊन पोहोचली आहे. पाकिस्तानची नशरा संधू एका स्थानाने नवव्या स्थानावर आली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियातील पावसामुळे प्रभावित झालेल्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात अनेक भारतीय गोलंदाजांना त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळाल्याचे दिसत आहे. रेणुका सिंग सहा स्थानांनी पुढे सरकून पाचव्या स्थानावर विराजमान झाली आहे, तर अरुंधती रेड्डी १९ स्थानांचा फायदा होऊन ती १६ व्या स्थानावर आणि श्री चरणी आठ स्थानांनी पुढे सरकून ३९ व्या स्थानावर पोहोचल्या आहेत.

Web Title: Deepti sharmas position suffers a major blow in womens t20 bowling rankings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 05:32 PM

Topics:  

  • Deepti Sharma
  • ICC Ranking
  • T20 cricket

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.