ICC T20 Ranking: Tilak Verma dominates ICC T20 rankings! He left behind 'this' Indian batsman along with Pakistan's Babar Azam..
ICC T20 Ranking : भारतीय T20 क्रिकेटमध्ये तिलक वर्मा हा नेहमीच चांगला खेळताना दिसून आला आहे. आता त्याच्या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. तिलक वर्मा गेल्या काही काळापासून मर्यादित क्रिकेट स्वरूपात शानदार कामगिरी करताना दिसत आहे. या दरम्यान, त्याने विरोधी संघाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आहे. यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या T20 फलंदाजांच्या क्रमवारीत तिलक वर्माने आता हरकती दाखवल्या आहेत. या दरम्यान, तिलकने पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम आणि भारताचा T20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव या दोघा मातब्बर फलंदाजांना मागे टाकले आहे.
भारतीय फलंदाज तिलक वर्मा आयसीसी पुरुषांच्या T20 क्रमवारीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. या दरम्यान, त्याला एका स्थानाचा मोठा फायदा झाला आहे. त्यानंतर त्याचे रेटिंग आता 804 वर पोहोचले आहे. काउंटी क्रिकेट दरम्यान चॅम्पियनशिपमध्ये तिलक वर्मा हॅम्पशायर संघाकडून खेळताना दिसणार आहे. यापूर्वी, तिलक वर्मा २ फेब्रुवारी २०२५ रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टी२० क्रिकेट स्वरूपातील त्याचा शेवटचा सामना खेळला होता. या मालिकेमध्ये वर्माने ४४.३३ च्या सरासरीने एकूण १३३ धावा फटाकवल्या होत्या.
हेही वाचा : कागिसो रबाडाने जसप्रीत बुमराहचा मोडला विश्वविक्रम, कसोटीत रचला नवा विक्रम
येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम गेल्या दोन वर्षांपासून आयसीसी पुरुषांच्या टी२० रँकिंगमध्ये सातत्याने अव्वल क्रमांकावर राज्य करत आहे. परंतु, आता त्याला थेट १२ व्या स्थानावर जावे लागले आहे. गेल्या काही काळापासून पाकिस्तानचा हा स्टार फलंदाज खराब लयीत दिसत आहे. त्याला धावांसाठी झगडावे लागत आहे. त्यामुळे त्याला आपल्याच मायदेशात म्हणजे पाकिस्तानमध्ये प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा : जसप्रीत बुमराहच्या फिटनेसवर अपडेट! मालिकेआधी भारतीय संघाच्या अडचणीमध्ये होणार वाढ? वाचा सविस्तर
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेड सध्या आयसीसी पुरुषांच्या टी२० रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. त्याचे रेटिंग सद्या ८५६ आहे. भारताचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा दुसऱ्या स्थानावर कायम आहे. त्याच वेळी, तिलक वर्मा या यादीत तिसऱ्या स्थान पटकावले आहे. तसेच, इंग्लंडचा फलंदाज फिल साल्टने चौथे स्थान तर जोस बटलर पाचव्या स्थानावर विराजमान आहे.