फोटो सौजन्य : BCCI
जसप्रीत बुमराह फिटनेस : भारताचा संघ आता आयपीएल झाल्यानंतर इंग्लडविरुद्ध मालिका खेळताना दिसणार आहे. त्याआधी सध्या भारताचा संघ हा इंग्लडविरुद्ध मालिकेआधी सराव करत आहे. भारतीय संघासाठी हा दौरा फारच महत्वाचा असणार आहे. या मालिकेमध्ये भारतीय संघाच्या कामगिरीवर सर्वाच्या नजरा खिळल्या आहेत. शुभमन गिलच्या हाती भारतीय संघाची कमान असताना आता भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत याच्या फिटनेसवर मोठी अपडेट समोर आली आहे.
टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे, जिथे २० जूनपासून दोन्ही संघांमध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. ही मालिका ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या मालिकेत युवा भारतीय संघाची कठीण परीक्षा होणार आहे, कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी स्वरूपातून निवृत्ती घेतली आहे. संघाची कमान शुभमन गिलच्या हाती आहे. त्याच वेळी, या मालिकेत सर्वांच्या नजरा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहवर असणार आहेत.
मालिकेपूर्वी, बुमराह या मालिकेतील सर्व सामने खेळू शकणार नाही अशा बातम्या येत होत्या, परंतु आता बुमराहच्या फिटनेस अपडेट समोर आल्या आहेत. बुमराह नेटमध्ये जोरदार गोलंदाजी करत आहे, प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल देखील त्याच्या गोलंदाजीने खूप प्रभावित झाले आहेत. टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल म्हणतात की व्यवस्थापन देखील आता बुमराहच्या फिटनेसवर समाधानी आहे. ही टीम इंडियासाठी एक चांगली बातमी आहे.
आयपीएल आधी झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याला दुखापत झाली होती त्यामुळे तो मालिकेमधून बाहेर झाला होता त्यानंतर चॅम्पियन ट्रॉफीमध्ये देखील तो खेळू शकला नाही. आयपीएलचे काही सामने झाल्यानंतर त्याच्या संघामध्ये पुन्हारागमन झाले. आता त्याच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीवर असणार आहे, त्याने आयपीएल २०२५ मध्ये पंधराहून अधिक विकेट्स घेतले. भारतीय संघासाठी जसप्रीत बुमराह एक महत्त्वाचा गोलंदाज आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये भारताच्या संघाने मालिकेमध्ये पराभव केला होता पण पहिल्या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने बुमराहच्या नेतृत्वात पहिला सामना जिंकला होता.