
Asia Cup 2025 Trophy Controversy: ICC takes a big step! 'This' plan to resolve the trophy controversy
IND VS PAK, Asia Cup 2025 Trophy Dispute : भारताने सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानला आशिया कपच्या अंतिम सामन्यात पराभूत करत जेतेपद जिंकले होते.परंतु, भारतीय संघ ट्रॉफीविनाच भारतात परतला होता. तेव्हापासून आशिया कप ट्रॉफी वाद सुरू आहे. आता आयसीसीकडून आशिया कप ट्रॉफी वाद सोडवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे
आयसीसीची एक बैठक सौहार्दपूर्ण झाली आणि सदस्यांनी यावर भर दिला की पाकिस्तान आणि भारत हे क्रिकेट जगतासाठी महत्त्वाचे असून त्यांनी त्यांचे प्रश्न सौहार्दपूर्णपणे सोडवायला हवेत. बोर्ड मध्यस्थी करण्यास तयार आहे, म्हणूनच नक्वी बैठकीत हजर राहिले होते. सूत्रांचे म्हणणे आहे की त्यांनी एक ठराव मंजूर केला आहे. बीसीसीआयकडून नक्वी यांच्या ट्रॉफी सादर करण्यास नकार दिल्याबद्दल बोर्डाला माहिती देण्यात आली आहे आणि शक्य तितक्या लवकर प्रकरण सोडवण्यासाठी आणि ट्रॉफी भारताला परत करण्यासाठी एक समिती स्थापन केली गेली आहे.
आशिया कप २०२५ चा अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत केले. एसीसी अध्यक्ष म्हणून मोहसिन नक्वी भारतीय संघाला आशिया कप विजेतेपद देण्यासाठी पोहोचले, परंतु भारतीय संघाने नक्वी यांच्याकडून विजेतेपद स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर नक्वी यांनी ट्रॉफी स्टेडियममधून बाहेर काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर भारतीय संघ ट्रॉफीशिवाय परतला.
मोहसीन नक्वी यांच्याकडून भारतीय संघाकडून विजेतेपद स्वीकारण्यामागचे कारण म्हणजे ते पाकिस्तानचे गृहमंत्री होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील संबंध ताणले गेले होते. आशिया कपच्या तीन सामन्यांदरम्यान भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणे देखील टाळले.
हेही वाचा : LA 2028 Olympics: पाकिस्तानी संघाला फटका! ऑलिंपिकमध्ये खेळणार नाही? नेमकं कारण काय?
यापूर्वी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नक्वी यांना ईमेलद्वारे आशिया कप विजेतेपद भारतीय संघाला परत करण्याची विनंती करण्यात आली होती आणि जर त्यांना प्रतिसाद मिळाला नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे हा मुद्दा उपस्थित करण्यात येतील अशी धमकी देण्यात आली होती.
आशिया कप २०२५ चे आयोजन दुबई येथे करण्यात आले होते. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला होता आणि आशिया कपच्या जेतेपदावर नाव कोरले होते.