अभिषेक शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
Abhishek Sharma creates history in T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. आज या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा शेवटचा सामना ब्रिस्बेनमधील ऐतिहासिक गाबा स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे.
हेही वाचा : LA 2028 Olympics: पाकिस्तानी संघाला फटका! ऑलिंपिकमध्ये खेळणार नाही? नेमकं कारण काय?
ब्रिस्बेनमधील गाबा स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या टी-२० सामन्यात, भारतीय फलंदाज अभिषेक शर्माने एक मोठा कारनाम केला आहे. चेंडूंच्या बाबतीत तो टी-२० मध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा खेळाडू बनला आहे. अभिषेक शर्माने सूर्यकुमार यादवला मागे टाकत फक्त ५२८ चेंडूंमध्ये ही कामगिरी करून दाखवली आहे.
१. ५२८ चेंडू – अभिषेक शर्मा (भारत)
२. ५५९ चेंडू – टिम डेव्हिड (ऑस्ट्रेलिया)
३. ५७३ चेंडू – सूर्यकुमार यादव (भारत)
४. ५९९ चेंडू – फिल साल्ट (इंग्लंड)
५. ६०४ चेंडू – ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया)
याव्यतिरिक्त, अभिषेक शर्मा भारतासाठी टी२० मध्ये १००० धावा पूर्ण करणारा दुसरा सर्वात जलद खेळाडू बनला आहे. त्याने १००० धावा पूर्ण करण्यासाठी २८ डाव घेतले आहेत. त्याच्या आधी माजी कर्णधार विराट कोहली आहे. टी२० मध्ये भारतासाठी विराट कोहलीने २७ डावात १००० धावा पूर्ण करण्याची कामगिरी केली आहे. केएल राहुल या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर विराजमान आहेत.
हेही वाचा : Hong Kong Cricket Sixes मध्ये भारताच्या हाती निराशा, दिनेश कार्तिकच्या संघाचा कुवेतनंतर यूएईकडून पराभूत
१. २७ डाव – विराट कोहली
१. २८ डाव – अभिषेक शर्मा
३. २९ डाव – केएल राहुल
४. ३१ डाव - सूर्यकुमार यादव
५. ४० डाव – रोहित शर्मा
गॅबा येथील सामन्यात पावसामुळे व्यत्यय आल्याने खेळ थांबवण्यात आला. ४.५ षटकांनंतर वीज पडली, ज्यामुळे खेळाडूंना मैदान सोडावे लागले आणि त्यानंतर काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. खेळ थांबण्यापूर्वी वेळी, भारताने एकही विकेट न गमावता ५२ धावा केल्या होत्या. दोन्ही सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आले. हे वृत्त लिहिताना, अभिषेक शर्माने १३ चेंडूत २३ धावा केल्या आहेत. तर शुभमन गिलने १६ चेंडूत २९ धावा करून नाबाद आहे.






