ICC ready for big bucks! Will the Test match be 4 days? 'These' five countries, including India and Australia, will be exceptions..
ICC ready for big bucks : दक्षिण आफ्रिकेने नुकत्याच पार पडलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलनमध्ये ऑस्ट्रेलियाला चार दिवसांत पराभूत केले. आफ्रिकेने २७ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला आणि आता कसोटी फॉरमॅटमध्ये बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे प्रमुख जय शाह यांनी आता कसोटी क्रिकेट पाचऐवजी चार दिवसांची करण्याचे संकेत दिले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) २०२७-२९ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) सायकलमध्ये लहान देशांसाठी चार दिवसांच्या कसोटी सामन्यांना मान्यता देण्यास तयार आहे, परंतु भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड अजूनही पारंपारिक पाच दिवसांचे सामने करण्यात आला आहे.
सामन्यांची संख्या एका दिवसाने कमी करण्याचा निर्णय हा एक महत्त्वाचा बदल असेल आणि लहान देशांना अधिक कसोटी आणि दीर्घ कालावधीच्या मालिका खेळण्यास मदत करेल. ‘द गार्डियन’ वृत्तपत्रातील एका वृत्तात म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात लॉर्ड्स येथे झालेल्या डब्ल्यूटीसी फायनल दरम्यान झालेल्या चर्चेत, आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी २०२७-२९ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलसाठी चार दिवसांच्या कसोटी सामन्यांना पाठिंबा दर्शविला. त्यात म्हटले आहे की, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांना अॅशेस, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आणि अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी पाच दिवसांच्या कसोटी मालिकेत खेळण्याची परवानगी असेल.
अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीची सुरुवात शुक्रवारपासून हेडिंग्ले येथे इंग्लंड आणि भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याने होईल. आयसीसीने २०१७ मध्ये पहिल्यांदा द्विपक्षीय सामन्यांसाठी चार दिवसांच्या कसोटी सामन्यांना मान्यता दिली. २०१९ आणि २०२३ मध्ये आयर्लंडविरुद्ध चार दिवसांच्या कसोटी सामन्यानंतर इंग्लंडने गेल्या महिन्यात ट्रेंट ब्रिज येथे झिम्बाब्वेविरुद्ध चार दिवसांची कसोटीही खेळली.
हेही वाचा : क्रिकेटच्या देवाकडे आता नवीन जबाबदारी! रेडिटचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून Sachin Tendulkar ची नियुक्ती..
अहवालानुसार, वेळ आणि खर्चामुळे अनेक लहान देशांना कसोटी सामन्यांचे आयोजन करण्यास रस नाही, परंतु चार दिवसांच्या कसोटी सामन्यांची सुरुवात झाल्यामुळे, तीन कसोटी सामन्यांची संपूर्ण मालिका तीन आठवड्यांपेक्षा कमी वेळात खेळता येईल. त्यात म्हटले आहे की, वेळ वाया जाऊ नये म्हणून, चार दिवसांच्या कसोटी सामन्यांमध्ये खेळण्याचा वेळ ९० षटकांवरून कमीत कमी ९८ षटकांपर्यंत वाढवण्यात आला आहे. अहवालात म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात लॉईसवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या रोमांचक अंतिम सामन्यात अविश्वविजेता बनल्यानंतरही, दक्षिण आफ्रिकेच्या एकाकी वेळापत्रकामुळे हा मुद्दा अधिकच अधोरेखित झाला आणि त्यानंतर बदलाची गरज भासू लागली. तथापि, २०२५-२७ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा सध्याच्या पाच दिवसांच्या सामन्यांच्या स्वरूपात खेळवली जाईल.