रवी शास्त्री आणि टीम इंडिया(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे, या मालिकेला २० जूनपासून लीड्समध्ये सुरूवात होणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या कसोटीसाठी आपला प्लेइंग-११ संघ निवडला आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात साई सुदर्शनला त्यांच्या इलेव्हनमध्ये संधि देण्यात आली आहे. कर्णधार शुभमन गिलकडे कर्णधारपदाची धुरा या मालिकेपासून सुरू होणार आहे.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात शास्त्री यांच्याकडून करुण नायरलाही स्थान देण्यात आली आहे. शास्त्री यांच्यामते भारतीय संघात साई सुदर्शन तिसऱ्या क्रमांकावर तर करुण नायरने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यावे. त्यांनी असे देखील म्हटले आहे की, यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल डावाची सुरुवात करणार आहेत.
हेही वाचा : क्रिकेटच्या देवाकडे आता नवीन जबाबदारी! रेडिटचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून Sachin Tendulkar ची नियुक्ती..
रवी शास्त्री यांनी मंगळवारी आयसीसी पुनरावलोकनात दरम्यान सांगितले की, “यशस्वी जयस्वाल डावाची सुरुवात करेल आणि केएल राहुल त्याच्यासोबत असणार आहे. हा दौरा दोघांसाठी देखील मोठा दौरा आहे. त्याच वेळी, केएल राहुलसाठी हा दौरा जास्त महत्त्वाचा आहे. तो सर्वात अनुभवी फलंदाज आहे. भारताने गेल्या इंग्लंड दौऱ्यावर असताना, त्याने (राहुल) डावाची सुरुवात केली, शतक झळकावले आणि चांगला दौरा केला. त्यामुळे मी त्याच्याकडून डावाची सुरुवात करण्याची अपेक्षा व्यक्त करेन.”
शास्त्री म्हणाले की, “मी तरुण खेळाडू साई सुदर्शनसोबत तिसऱ्या क्रमांकावर जाईन. मी त्याच्याबद्दल जे काही पाहिले आहे, ते खूप प्रभावी करणार असे आहे. हा दौरा त्याच्यासाठी एक चांगला अनुभव असणार आहे.”
शास्त्री यांनी नवीन कसोटी कर्णधार गिलला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी ठेवले, ज्याने त्याच्या पहिल्या ३२ कसोटी सामन्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. शास्त्रींच्या मते, सध्याच्या फॉर्मच्या आधारे, आठ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर कसोटी संघात परतलेला करुण नायर हेडिंग्ले येथे पाचव्या क्रमांकावर आदर्श पर्याय ठरू शकेल.
तसेच शास्त्री असे म्हणाले की, सध्याच्या फॉर्म बघता करुण नायर हा सर्वोत्तम पर्याय असणार आहे. तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करतो, त्याला भारताकडून खेळून बराच काळ झाला आहे. ऋषभ पंत सहाव्या क्रमांकावर असेल. रवींद्र जडेजा सातव्या क्रमांकावर खेळवण्याचा विचार आहे. गोलंदाजीच्या आक्रमणाबद्दल शास्त्री म्हणाले की लीड्समधील परिस्थिती लक्षात घेता ते तीन वेगवान गोलंदाजांसह जणार आहेत. जाईल.
शास्त्री म्हणाले की, मला माहित आहे की शार्दुल (ठाकूर) आणि नितीश रेड्डी यांच्यातील स्पर्धा कठीण असणार आहे. परंतु, तुम्हाला हे पहावे लागणार आहे की, कोण किती गोलंदाजी करतो. जर रेड्डी तुम्हाला १२, १४ षटके देणार असेल तर त्याच्या फलंदाजीमुळे त्याला संधी मिळू शकते. तीन वेगवान गोलंदाजांमध्ये मी प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्यासोबत जाईन. असे देखील रवी शास्त्री यांनी स्पष्ट केले.
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल, करुण नायर, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर/नितीश रेड्डी, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.