Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC Women Cricket World Cup Points Table : AUS vs SL सामना रद्द झाल्यानंतर भारताचे नशीब उजळले, जाणून घ्या गुणतालिकेचे गणित

पावसामुळे श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी १ गुण विभागण्यात आला आहे. या एका गुणासह ऑस्ट्रेलिया आयसीसी महिला विश्वचषक पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 06, 2025 | 09:54 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये आज कोलंबो येथे सामना खेळवला जाणार आहे, हा सामना टीम इंडियाचा या स्पर्धेचा दुसरा सामना असणार आहे. पहिल्या सामन्यात भारताच्या संघाने श्रीलंकेचा पराभव करुन पहिला विजय नोंदवला आहे. तर काल झालेला श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामधील सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला होता. श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये झालेला सामना रद्द झाल्यानंतर आता पाॅइंट टेबलचे स्थिती बदलणार आहे. श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला विश्वचषक २०२५ चा ५ वा सामना शनिवार, ४ ऑक्टोबर रोजी पावसामुळे रद्द झाला. 

कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात एकही चेंडू टाकता आला नाही, तर टॉसही होऊ शकला नाही. पावसामुळे श्रीलंका डब्ल्यू विरुद्ध ऑस्ट्रेलिया डब्ल्यू सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी १ गुण विभागण्यात आला आहे. या एका गुणासह ऑस्ट्रेलिया आयसीसी महिला विश्वचषक पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेने आपले खाते उघडले आहे. श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना रद्द झाल्यामुळे भारताचे नशीब सर्वात जास्त चमकले आहे, कारण हरमनप्रीत कौर आणि कंपनीसाठी पॉइंट्स टेबलमध्ये नंबर १ होण्याचे दार उघडले आहे. चला कसे ते समजून घेऊया –

Team India New Captain : भारतीय ODI संघाची कमान मिळाल्यानंतर शुभमन गिलची पहिली रिॲक्शन! विश्वचषकावरही केले एक मोठे विधान

ऑस्ट्रेलियाने त्यांच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडला ८९ धावांनी हरवले. त्यानंतर त्यांनी केवळ दोन गुण मिळवले नाहीत तर त्यांचा नेट रन रेटही भारतापेक्षा सुधारला. जर ऑस्ट्रेलियन संघाने श्रीलंकेलाही हरवले असते तर त्यांनी त्यांचा नेट रन रेट चार गुणांनी वाढवला असता आणि अव्वल स्थान मिळवले असते. आज, रविवार, ५ ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आहे. जरी टीम इंडियाने हा सामना जिंकला असता, तरी त्यांना अव्वल स्थान मिळविण्यासाठी नेट रन रेटवर ऑस्ट्रेलियाशी झुंज द्यावी लागली असती.

आता श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना रद्द झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाला फक्त एक गुण मिळाला आहे आणि त्यांच्या नेट रन रेटवर कोणताही परिणाम झालेला नाही. जर भारताने आज पाकिस्तानला हरवले तर टीम इंडियाला नंबर वन होण्याची संधी असेल. भारताने त्यांच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा ५९ धावांनी पराभव केला. आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत सध्या ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि बांगलादेशनंतर चौथ्या स्थानावर आहे.

आईसीसी वुमेंस वर्ल्ड कप पॉइंट्स टेबल 2025

संघ सामना विजय पराभव टाय निकाल नाही गुण रन रेट
ऑस्ट्रेलिया 2 1 0 0 1 3 +1.780
इंग्लैंड 1 1 0 0 0 2 +3.773
बांग्लादेश 1 1 0 0 0 2 +1.623
भारत 1 1 0 0 0 2 +1.255
श्रीलंका 1 0 1 0 1 1 -1.255
पाकिस्तान 1 0 1 0 0 0 -1.623
न्यूजीलैंड 1 0 1 0 0 0 -1.780
साउथ अफ्रीका 1 0 1 0 0 0 -3.773

Web Title: Icc women cricket world cup points table india luck brightened after aus vs sl match was cancelled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 10:19 AM

Topics:  

  • AUS vs SL
  • cricket
  • ICC Women Cricket World Cup 2025
  • IND VS PAK
  • indian cricket team
  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

Chess Tournament : मुंबई महापौर चषक शालेय बुद्धिबळ स्पर्धा 24 ऑक्टोबरपासून; 135 पुरस्कारांची लयलूट!
1

Chess Tournament : मुंबई महापौर चषक शालेय बुद्धिबळ स्पर्धा 24 ऑक्टोबरपासून; 135 पुरस्कारांची लयलूट!

Sports Business : क्रीडा उद्योगाच्या विकासासाठी मुंबईत गुरुवारी मंथन; उद्योजक, उत्पादक येणार एकाच व्यासपीठावर
2

Sports Business : क्रीडा उद्योगाच्या विकासासाठी मुंबईत गुरुवारी मंथन; उद्योजक, उत्पादक येणार एकाच व्यासपीठावर

Asian Para Games : पोलिओवर मात, जिद्दीने गाठले यश! अशोक मलिक यांना पॉवरलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक
3

Asian Para Games : पोलिओवर मात, जिद्दीने गाठले यश! अशोक मलिक यांना पॉवरलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक

IND vs NZ: टीम इंडियाचे न्यूझीलंडमध्ये लँडिंग, T20 सिरीजपूर्वीच चाहत्यांमध्ये क्रेझ; 3 सामन्यांचे तिकिट्स SOLD OUT
4

IND vs NZ: टीम इंडियाचे न्यूझीलंडमध्ये लँडिंग, T20 सिरीजपूर्वीच चाहत्यांमध्ये क्रेझ; 3 सामन्यांचे तिकिट्स SOLD OUT

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.