
IND W vs NZ W: India defeats New Zealand by 53 runs! Enters semifinal with a bang; Mandhana-Rawal hits centuries
हेही वाचा : IND W vs NZ W : भारताविरुद्ध न्यूझीलंडसमोर DLS पद्धतीनुसार 325 धावांचे लक्ष्य; रावल-मानधनाचा शतकी तडाखा
नाणेफेक गमावणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत, प्रतिका रावल आणि स्मृती मानधना या भारतीय सलामी जोडीच्या शतकांच्या जोरावर आणि जेमिमा रॉड्रिग्जच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर भारताने ४९ ओव्हरमध्ये ३ गडी गामावत ३४० धावा केल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे एक ओव्हर कमी करण्यात आली होती. हा भारतीय संघाचा आतापर्यंतचा विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या आहे.
स्मृती मानधना आणि प्रतीका रावल या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी २१२ धावांची मोठी भागीदारी करून भारताच्या विजयाचा पाया रचला. मानधनाने ९५ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांसह १०९ धावांची धमाकेदार खेळी केली. तर प्रतिका रावलने १३४ चेंडूचा सामाना करत १३ चौकार आणि २ षटकारांसह १२२ धावांची मूल्यवान खेळी केली. दोघे बाद झाल्यानंतर, जेमिमा रॉड्रिग्जने डावाची सूत्रे घेऊन आक्रमक फलंदाजी केली. तिने ५५ चेंडूत ११ चौकारांसह नाबाद ७६ धावा काढल्या आणि धावसंख्या ३४० पर्यंत पोहचवण्यात मोठे योगदान दिले.
पावसामुळे बराच वेळ वाया गेला. त्यामुळे न्यूझीलंडला डीएलएस पद्धतीने ४४ षटकांत ३२५ धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. इतक्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब राहिली. संघाने केवळ ५९ धावांत तीन विकेट गमावल्या. अमेलिया केर (४५) ने मधल्या फळीत डाव स्थिर करण्याचा प्रयत्न केला, तरी १५४ धावांत पाच विकेट गमावल्यानंतर संघावर दबाव निर्माण झाला. शेवटी, ब्रुक हॅलिडेने ८४ चेंडूत ८१ धावा करत दमदार झुंज दिली. पण, ती अपुरी ठरली. यष्टीरक्षक इसाबेल गेजने देखील नाबाद ६५ (५१ चेंडू) धावा करून विजयाकडे वाटचाल केली, परंतु तिचे प्रयत्न अयशस्वी ठरले. न्यूझीलंड महिला संघाला ४४ षटकांत आठ बाद २७१ धावाच करता आल्या आणि परिणामी भारतीय संघाने सामना ५३ धावांनी जिंकला. भारताकडून क्रांती गौड आणि रेणुका ठाकूर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या, तर स्नेह राणा, श्री चरणी, दीप्ती शर्मा आणि प्रतीका रावल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. भारताच्या या विजयासह, न्यूझीलंड आणि श्रीलंका विश्वचषकातून बाहेर पडले आहेत.