प्रतिका रावल आणि स्मृती मानधना(फोटो-सोशल मीडिया)
IND W vs NZ W, Women’s World Cup 2025 : आज महिला एकदिवसीय विश्वचषकात भारतीय महिला संघ आणि न्यूझीलंड महिला संघ आमनेसामने आला आहे. हा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जात आहे. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला होता. पावसामुळे एक ओव्हर कमी करण्यात आली आहे. टॉस गमावणाऱ्या भारतीय संघाने ४९ ओव्हरमध्ये ३ विकेट्स गमावून प्रतिका रावल आणि स्मृती मानधना या भारतीय सलामी जोडीच्या शतकांच्या जोरावर भारताने ३४० धावांचा डोंगर उभा केल आहे. न्यूझीलंडला हा सामना जिंकण्यासाठी डीएलएस पद्धतीनुसार ४४ ओव्हरमध्ये ३२५ लक्ष्य देण्यात आले आहे. न्यूझीलंडकडून रोझमेरी मायरने शानदार गोलंदाजी करत १ विकेट घेतली.
न्यूझीलंडची कर्णधार सोफी डेव्हाईन नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारतीय महिला संघाला फलंदाजीला आमंत्रित केले. सोफी डेव्हाईनचा हा निर्णय चांगलाच अंगलट आला. कारण भारतीय सलामी जोडी प्रतिका रावल आणि स्मृती मानधना या जोडीने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि पहिल्या विकेट्ससाठी ३३.२ ओव्हरमध्ये २१२ धावांची भक्कम भागीदारी रचली. या दरम्यान स्मृती मानधनाने ९५ चेंडूत १०९ धावांची धमकेदार खेळी केली. ज्यामध्ये तिने १० चौकार आणि ४ षटकार लगावले आहेत. तिला सुझी बेट्सने बाद केले. मानधनानंतर प्रतिकाने मैदानात आलेल्या जेमिमा रॉड्रिग्सच्या सोबत ७६ धावांची भागीदारी रचली. या दरम्यान प्रतीकाने आपले शतक पूर्ण केले. तिने १३४ चेंडूत १२२ धावा केल्या. यामध्ये तिने १३ चौकार आणि २ षटकार लगावले. प्रतिकाला १२२ धावांवर अमेलिया केरने बाद केले.
प्रतिका बाद झाल्यावर जेमिमा रॉड्रिग्सने आक्रमक पवित्रा घेत शानदार फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. प्रतिकानंतर मैदानात आलेली कर्णधार हरमनप्रीत कौर १० धावा काढून रोझमेरी मायरची शिकार ठरली. त्यानंतर रीचा घोष नाबाद ४ आणि जेमिमा रॉड्रिग्स नाबाद ७६ धावा(११ चौकार) करून भारताला ३४० यापर्यंत पोहचवले. न्यूझीलंडकडून अमेलिया केर,सुझी बेट्स आणि रोझमेरी मायर यांनी प्रत्येकी १ बळी घेतला आहे.
भारताच्या डावावेळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खेळ काही वेळ थांबवावा लागल्याने भारताच्या डावातील एक ओव्हर कमी करून ४९ ओव्हरचा डाव करण्यात आला. आता पावसामुळे न्यूझीलंडच्या डावातील ६ ओव्हर कमी करून त्यांचा डाव ४४ ओव्हरचा करण्यात आला असून डीएलएसनुसार न्यूझीलंडसमोर ४४ ओव्हरमध्ये ३२५ लक्ष्य देण्यात आले आहे.
झीलंड महिला संघ संघ: सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, सोफी डेव्हाईन (कर्णधार), अमेलिया केर, ब्रुक हॅलिडे, इसाबेला गेज (यष्टीरक्षक), जेस केर, रोझमेरी मायर, ब्री एलिंग, एडन कार्सन, ली ताहुहू, हन्ना रो, पॉली इंग्लिस आणि बेला जेम्स.
भारतीय महिला संघ: प्रतिका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमनजोत कौर, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्स, अरविंद रेड्डी, जेमिमाह रॉड्रिग्ज आणि युवती.