Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानचा बांग्लादेशवर 7 विकेटसनी दणदणीत विजय, ईमाम उल हक-मोहम्मद रिझवानची निर्णायक खेळी

लाहोरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र बांग्लादेशला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही. बांगलादेशला 192 धावांपर्यंतच मजल मारता आली. शाकीबने 53 आणि मुशफिकर याने 64 धावा केल्या. पाकिस्तानकडून हरीस रऊफ याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

  • By Amrut Sutar
Updated On: Sep 07, 2023 | 07:14 AM
पाकिस्तानचा बांग्लादेशवर 7 विकेटसनी दणदणीत विजय, ईमाम उल हक-मोहम्मद रिझवानची निर्णायक खेळी
Follow Us
Close
Follow Us:

लाहोर : आशिया कप 2023 (Asia Cup) अंतर्गत सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात काल (बुधवारी) पाकिस्तानने बांगलादेशवर (Pak vs Ban) दणदणीत सात विकेट राखत विजय मिळवला. लाहोरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र बांग्लादेशला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही. बांगलादेशला 192 धावांपर्यंतच मजल मारता आली. शाकीबने 53 आणि मुशफिकर याने 64 धावा केल्या. पाकिस्तानकडून हरीस रऊफ याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. नसीम शाह याने 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर फहीम अश्रफ आणि शाहीन अफ्रिदी या दोघांनी 1-1 विकेट घेतली. कॅप्टन शाकिब अल हसन आणि मुशफिकर रहीम दोघांनी शतकी भागीदारी करत बांगलादेशला 192 धावांपर्यंत पोहचवलं. (Imam-ul-Haq-Mohammed Rizwan play decisive knock in Pakistan’s resounding win over Bangladesh by 7 wickets)

Lahore witnesses a Haris Rauf special, as Pakistan win the first Super-four stage game of Asia Cup 2023

Read more ➡️ https://t.co/GnQG5kP5Zh#PAKvBAN | #AsiaCup2023

— PCB Media (@TheRealPCBMedia) September 6, 2023

बांग्लादेशची खराब सुरुवात
पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांना जेरीस आणित आणि पहिल्या पॉवर प्लेमध्ये पाकिस्तानच्या संघाचे चार महत्त्वाचे बळी घेतले होते. पाकिस्तानच्या संघाने दुसऱ्याच षटकात बांगलादेशला पहिला धक्का दिला आणि सलामीवीर फलंदाज मिराज खातेही न उघडताच बाद झाला. त्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीने पाचव्या षटकात लिटन दासला बाद करून मोठा धक्का दिला. त्याला 13 चेंडूत केवळ 16 धावा करता आल्या. यानंतर हॅरिस रौफने मोहम्मद नईमला बाद केले. त्याला 25 चेंडूत केवळ 20 धावा करता आल्या. पॉवर प्लेमध्ये तौहीद हिरदोय हॅरिस हा रौफचा दुसरा बळी ठरला. 9 चेंडूत केवळ दोन धावा केल्यानंतर तो बोल्ड झाला. याआधी, दोन्ही संघांनी झिम्बाब्वेचा माजी कर्णधार हिथ स्ट्रीक यांच्या निधनाबद्दल एक मिनिट मौन पाळले.

ईमाम उल हक-रिझवानची झुंझार खेळी

दरम्यान, 193 धावांचे आव्हान घेऊन उतरलेला पाकिस्तान संघाने संयमी सुरुवात करीत विजयाच्या दिशेने आगेकूच केली.  पाकिस्तानकडून ईमाम उल हक आणि मोहम्मद रिझवान या दोघांनी अर्धशतकं ठोकली. फखर झमान याने 20 आणि कॅप्टन बाबर आझम याने 17 धावांचं योगदान दिलं. ईमाम उल हक याने 84 बॉलमध्ये 5 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने 78 धावांची अर्धशतकी खेळी केली. 193 धावांचं आव्हान पाकिस्ताननं 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. आणि सुपर फोरमधला पहिला विजय मिळवला. आता पाकिस्तानची गाठ बलाढ्य भारताशी रविवारी पडणार आहे.

बांग्लादेशला दोन्ही सामने जिंकावेच लागतील

या विजयासह पाकिस्तानच्या फायनलमध्ये पोहचण्याच्या आशा आता आणखी वाढल्या आहेत. तर बांगलादेशला आव्हान कायम राखण्यासाठी आता उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. बांग्लादेशचा पुढील सामन भारत आणि श्रीलंका यांच्याबरोबर होणार आहे.

Web Title: Imam ul haq mohammed rizwan play decisive knock in pakistan resounding win over bangladesh by seven wickets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2023 | 07:09 AM

Topics:  

  • Asia Cup
  • india
  • pakistan

संबंधित बातम्या

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
1

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय
2

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका
3

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका

Asim Munir Nuke threat : पाकिस्तानचा अणुब्लफ फेल? असीम मुनीरच्या धमक्या निरर्थक, तज्ज्ञ म्हटले अणुबॉम्बची चाचणी अशक्य
4

Asim Munir Nuke threat : पाकिस्तानचा अणुब्लफ फेल? असीम मुनीरच्या धमक्या निरर्थक, तज्ज्ञ म्हटले अणुबॉम्बची चाचणी अशक्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.