Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकेच्या खेळाडूवर ५ वर्षांची बंदी, ICC ने घेतला कठोर निर्णय

मॅच फिक्सिंगचा प्रयत्न केल्याबद्दल ICC ने श्रीलंकेचा माजी अष्टपैलू खेळाडू सालिया समन याच्यावर ५ वर्षांसाठी बंदी घातली आहे. हा निर्णय अबू धाबी टी१० लीगशी संबंधित आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 15, 2025 | 08:01 PM
मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकेच्या खेळाडूवर ५ वर्षांची बंदी, ICC ने घेतला कठोर निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

Saliya Saman Banned: श्रीलंकेचा माजी अष्टपैलू खेळाडू सालिया समन (Saliya Saman) याला आयसीसीने (ICC) ५ वर्षांसाठी निलंबित केले आहे. एमिरेट्स क्रिकेट बोर्ड (ECB) च्या अँटी-करप्शन कोडचे (Anti-Corruption Code) उल्लंघन केल्याबद्दल हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. ही घटना २०२१ च्या अबू धाबी टी१० लीगशी संबंधित असून, त्यात मॅच फिक्सिंगचा प्रयत्न केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे.

सालिया समनवर ५ वर्षांसाठी बंदी

आयसीसीच्या अँटी-करप्शन न्यायाधिकरण टीमने (Anti-Corruption Tribunal) श्रीलंकेचा माजी देशांतर्गत खेळाडू सालिया समन याला दोषी ठरवले आहे. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाच्या क्रिकेटमधून त्याला ५ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. त्याने मॅच फिक्सिंगचा प्रयत्न केल्याने त्याला ही शिक्षा झाली आहे. समनला सप्टेंबर २०२३ मध्येच निलंबित करण्यात आले होते आणि आता त्याच्यावर अधिकृतपणे बंदी घालण्यात आली आहे.

Former Sri Lankan domestic cricketer #SaliyaSaman has been banned from all forms of Cricket for five years after an ICC Anti-Corruption Tribunal found him guilty of breaching the Emirates Cricket Board (ECB) Anti-Corruption Code. pic.twitter.com/3C4OSctYQE — All India Radio News (@airnewsalerts) August 15, 2025

The Hundred 2025 : अप्रिय घटना! चेंडू हेल्मेटमधून आरपार, लागली रक्ताची धार! अखेर फलंदाजाला सोडावे लागले मैदान..

नेमकं प्रकरण काय आहे?

२०२१ च्या अबू धाबी टी१० क्रिकेट लीगमध्ये सालिया समन याने मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न केला. त्याने स्पर्धेतील सामने फिक्स करण्याचा आणि चुकीच्या पद्धतीने त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय त्याने इतर खेळाडूंनाही चुकीच्या कामासाठी पैसे देण्याचे आमिष दाखवले. या गंभीर आरोपांमुळे, आयसीसीच्या अँटी-करप्शन न्यायाधिकरणने त्याला शिक्षा देण्याचा निर्णय घेतला.

  • अनुच्छेद २.१.१: २०२१ च्या अबू धाबी टी-१० लीगमध्ये सामने फिक्स करण्याचा, कट रचण्याचा किंवा अयोग्य रीतीने प्रभावित करण्याचा प्रयत्न करणे.
  • अनुच्छेद २.१.३: भ्रष्ट आचरण करण्यासाठी अन्य सहभागी खेळाडूला बक्षीस देण्याची ऑफर देणे.
  • अनुच्छेद २.१.४: कोणत्याही सहभागी खेळाडूला संहिताच्या अनुच्छेद २.१ चे उल्लंघन करण्यासाठी प्रवृत्त करणे किंवा मदत करणे.

Independence Day 2025 : जे गावसकर-सचिन सारख्या दिग्गजांना जमलं नाही, ते ‘या’ खेळाडूने केलं; १५ ऑगस्ट रोजी झळकावलं शतक

सालिया समनची क्रिकेट कारकीर्द

३९ वर्षीय सालिया समन हा श्रीलंकेचा माजी देशांतर्गत अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने श्रीलंका अंडर १७ आणि १९ क्रिकेट संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने १०१ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २ शतके आणि २२ अर्धशतकांसह ३६६२ धावा केल्या आहेत, तसेच २३१ बळी घेतले आहेत. लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने ८९८ धावा आणि ८४ बळी घेतले आहेत. टी२० क्रिकेटमध्येही त्याने ४७ सामन्यांमध्ये ६७३ धावा आणि ५८ बळी घेतले आहेत. मात्र, आता मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे त्याच्या कारकिर्दीवर मोठे संकट आले आहे.

Web Title: In match fixing case sri lankan all rounder banned for 5 years icc takes strict decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2025 | 08:00 PM

Topics:  

  • ICC
  • Sri Lanka

संबंधित बातम्या

ICC T20 World Cup 2026 च्या मॅच तिकिटांची विक्री सुरू; फक्त ‘इतक्या’ रुपयांत चाहत्यांना मिळणार सामन्याचा आनंद!
1

ICC T20 World Cup 2026 च्या मॅच तिकिटांची विक्री सुरू; फक्त ‘इतक्या’ रुपयांत चाहत्यांना मिळणार सामन्याचा आनंद!

आशिया चषकाची ट्रॉफी भारताला का मिळत नाहीये? PCB पुढे ICC आणि BCCI नरमले का? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2

आशिया चषकाची ट्रॉफी भारताला का मिळत नाहीये? PCB पुढे ICC आणि BCCI नरमले का? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

JioHotstar ने ICC ला दिला झटका, T20 विश्वचषकाच्या प्रसारणातून घेतली माघार; हजारो कोटींचा होणार करार
3

JioHotstar ने ICC ला दिला झटका, T20 विश्वचषकाच्या प्रसारणातून घेतली माघार; हजारो कोटींचा होणार करार

IND vs SA: ICC कडून टीम इंडियाला मोठी शिक्षा; वनडे मालिकेत ‘या’ मोठ्या चुकीमुळे लागला भरपूर दंड!
4

IND vs SA: ICC कडून टीम इंडियाला मोठी शिक्षा; वनडे मालिकेत ‘या’ मोठ्या चुकीमुळे लागला भरपूर दंड!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.