रोहित शर्मा आणि विराट कोहली(फोटो -सोशल मीडिया)
Virat Kohli scored a century on Independence Day: भारतीय क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. तो मैदानावर असला की विरोधी टीमच्या गोलंदाजांना घाम फुटतो. तो कुणावरच दया करत नाही. त्याने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. त्याममध्ये त्याने एक विशेष केला आहे ते म्हणजे त्याने भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी शतक झळकावले आहे. स्वातंत्र्यदिनी शतक झळकावणारा विराट कोहली हा भारतीय क्रिकेट इतिहासातील एकमेव फलंदाज आहे. विशेष म्हणजे कोहलीने परदेशाच्या भूमीवर हा पराक्रम केला आहे.
२०१९ मध्ये भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर असताना तिने भारतने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली होती. या मालिकेतील शेवटचा आणि तिसरा सामना १४ ऑगस्ट रोजी सुरू झाला होता. पावसामुळे सामना भारतीय वेळेनुसार दुसऱ्या दिवशी म्हणजेच १५ ऑगस्ट पर्यंत चालला होता. या सामन्यात कोहलीने शतक झळकावले आणि एक विक्रम आपल्या नावावर केला होता. विराट कोहलीच्या शतकामुळे टीम इंडियाने केवळ सामना जिंकला नाही तर मालिका देखील आपल्या खिशात टाकली.
या विराट कोहलीसाठी ऐतिहासिक ठरलेल्या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ख्रिस गेलच्या तुफानी ७२ आणि एविन लुईसच्या ४३ धावांच्या मदतीने वेस्ट इंडिजने ३५ षटकांत ७ गडी गमावून २४० धावा उभ्या केल्या होत्या. ख्रिस गेल आणि एविन लुईस यांनी पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी रचली होती. परंतु, नियमित अंतराने विकेट पडत गेल्या. पावसामुळे या सामन्यात अडचणी येत गेल्या.
भारताला ३५ षटकांत विजयासाठी २५५ धावा करायच्या होत्या. भारताची सुरुवात मात्र चांगली झाली नाही. सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या १० धावा काढून माघारी गेला. पण त्यानंतर धवन आणि कोहली यांनी मोठी भागीदारी रचली आणि भारताच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर कोहलीने अय्यरसोबत चौथ्या विकेटसाठी ९४ चेंडूत १२० धावांची मोठी भागीदारी रचली आणि भारताचा विजय सोपा केला.
या सामन्यात कोहलीने ९९ चेंडूचा सामना करत ११४ धावांची नाबाद खेळी केली. यामध्ये त्याने १४ चौकार देखील लगावले. तसेच श्रेयस अय्यरने ४१ चेंडूत ६५ धावा केल्या होत्या. भारताने ३२.३ षटकांत २५६ धावा करत सामना सहज जिंकला आणि मालिका विजय निश्चित केला. या शतकी खेळीसाठी कोहलीला सामनावीराचा पुरस्कार दिला गेला होता. उल्लेखनीय म्हणजे हा सामना ख्रिस गेलच्या एकदिवसीय कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. गेलने याबाबत अधिकृत घोषणा केली नव्हती, मात्र हा त्याचा शेवटचा सामना आहे असे सर्वांना वाटत आले होते.
हेही वाचा : ‘धोनीने इलेव्हनमधून वगळले आणि मी निवृत्ती..’, वीरेंद्र सेहवागने केला खळबळजनक खुलासा