Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

U19 World Cup 2026 : वैभव सूर्यवंशीला बाबर आझमचा विक्रम मोडण्याची संधी! अफगाणिस्तानविरुद्ध ‘ही’ कमगिरी करून रचणार इतिहास 

आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज भारत १९ वर्षांखालील संघाचा खेळाडू वैभव सूर्यवंशीला अफगाणिस्तान १९ वर्षांखालील संघाविरुद्ध इतिहास रचण्याची संधी आहे. तो बाबर आझमचा विक्रम मोडू शकतो.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 04, 2026 | 01:23 PM
U19 World Cup 2026: Vaibhav Suryavanshi has a chance to break Babar Azam's record! He will make history by achieving 'this' feat against Afghanistan.

U19 World Cup 2026: Vaibhav Suryavanshi has a chance to break Babar Azam's record! He will make history by achieving 'this' feat against Afghanistan.

Follow Us
Follow Us:

IND U19 vs AFG U19, U19 World Cup 2026 : आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज भारत १९ वर्षांखालील संघ विरुद्ध अफगाणिस्तान १९ वर्षांखालील संघ यांच्यात दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे सुरू आहे. या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भारतीय  १९ वर्षांखालील संघाचा स्फोटक खेळाडू वैभव सूर्यवंशीला या सामन्यात इतिहास रचण्याची संधी आहे. या स्पर्धेत आतापर्यंत वैभव सूर्यवंशीने ३९ पेक्षा जास्त सरासरीने १९६ धावा फटकावल्या आहेत. त्याला बाबर आझमचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

हेही वाचा : T20 World Cup 2026: पाकिस्तानच्या बहिष्कारावर प्रश्नचिन्ह! कोच गौतम गंभीरच्या प्रतिक्रियेमुळे उडाली खळबळ; नेमकं काय घडलं?

वैभव सूर्यवंशी उपांत्य फेरीत स्वत:ला सिद्ध करण्याची संधी

जर वैभव सूर्यवंशी अफगाणिस्तानविरुद्ध मोठी खेळी करण्यात यशस्वी ठरला, म्हणजेच जर त्याने शतक झळकवले तर तो एकाच वेळी दोन मोठ्या कामगिरी पार करू शकतो. यामध्ये त्याला १९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यांमध्ये सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनू शकतो, तर दुसरीकडे, पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमचा विक्रम देखील त्याला मोडता येणे शक्य आहे.

बाबर आझमचा विक्रम धोक्यात

वैभव सूर्यवंशीने उपांत्य फेरीत शतक ठोकत,  १०३ किंवा त्याहून अधिक धावा केल्या तर तो बाबर आझमचा १९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यांतील धावांचा विक्रम  मोडू शकतो. बाबरने त्याच्या १९ वर्षांखालील कारकिर्दीत १२७१ धावा फटकावल्या आहेत. याचा अर्थ उपांत्य सामना केवळ भारतीय संघासाठीच नाही तर वैभव सूर्यवंशीच्या भावी कारकिर्दीसाठीही मैलाचा दगड ठरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : IND U19 vs AFG U19 : अफगाणिस्तानसमोर भारताची अभेद्य भिंत! TOSS जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय

वैभव सूर्यवंशी बनणार नंबर १?

दरम्यान, १९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यांमध्ये सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम बांगलादेशच्या अझीझुल हकीमच्या नावावर जमा आहे.  त्याने ३७ सामन्यांपैकी ३५ डावात १२६१ धावा फटकावल्या आहेत. दुसरीकडे, वैभव सूर्यवंशीने फक्त २३ सामन्यातच  ११६९ धावा केल्या आहेत आणि तो यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. विशेष म्हणजे वैभव सूर्यवंशीची सरासरी ५० पेक्षा जास्त आहे आणि त्याचा स्ट्राईक रेट देखील १५८ पेक्षा जास्त आहे, जो १९ वर्षांखालील एकदिवसीय इतिहासातील कोणत्याही फलंदाजापेक्षा सर्वोत्तम मानला जात आहे. बांगलादेश स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे, उपांत्य फेरीत वैभव सूर्यवंशीला अझीझुल हकीमला पिछाडीवर टाकण्याची संधी आहे. हे साध्य करण्यासाठी त्याला ९३ धावांची आवश्यकता असणार आहे.

Web Title: Ind u19 vs afg u19 vaibhav suryavanshi has the opportunity to break babar azams record against afghanistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • Babar Azam
  • IND vs AFG
  • T20 World Cup 2026
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

IND vs AFG: भारताकडून पराभवानंतर अफगाणिस्तानला मोठा धक्का; ICC ची कर्णधार शाहिदीवर कारवाई
1

IND vs AFG: भारताकडून पराभवानंतर अफगाणिस्तानला मोठा धक्का; ICC ची कर्णधार शाहिदीवर कारवाई

Ind A vs Sl A Final: Vaibhav Sooryavanshi ची वादळी खेळी! श्रीलंकेच्या गोलंदाजांना धू-धू धुतले; 20 वर्षांचा विश्वविक्रम मोडला
2

Ind A vs Sl A Final: Vaibhav Sooryavanshi ची वादळी खेळी! श्रीलंकेच्या गोलंदाजांना धू-धू धुतले; 20 वर्षांचा विश्वविक्रम मोडला

IND vs AFG 3rd ODI Live: अफगाणिस्तानचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय; टीम इंडियात 3 मोठे बदल, व्हाईटवॉशसाठी भारत सज्ज
3

IND vs AFG 3rd ODI Live: अफगाणिस्तानचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय; टीम इंडियात 3 मोठे बदल, व्हाईटवॉशसाठी भारत सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.