Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs USA, U19 World Cup 2026 : भारताची U19 World Cup ची विजयी सुरुवात! हेनिल पटेलच्या वादळात अमेरिका उद्ध्वस्त 

आज बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे आयसीसी अंडर-१९ विश्वचषक २०२६ चा पहिला सामना भारत आणि अमेरिका यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारताने अमेरिकेवर ६ विकेट्सने विजय मिळवला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 15, 2026 | 08:28 PM
IND vs USA, U19 World Cup 2026: India makes a winning start to the U19 World Cup! USA devastated by Henil Patel's storm.

IND vs USA, U19 World Cup 2026: India makes a winning start to the U19 World Cup! USA devastated by Henil Patel's storm.

Follow Us
Close
Follow Us:

India makes a winning start to the U19 World Cup 2026 : आज आयसीसी अंडर-१९ विश्वचषक २०२६ चा पहिला सामना बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे भारत आणि अमेरिका यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारताने ६ विकेट्सने विजय मिळवला आणि आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली. टॉस गमावणाऱ्या अमेरिका संघाने सर्वबाद १०७ धावा केल्या होत्या. सामान्यादरम्यान पावसाचा व्यत्यय आल्याने भारताला ९६ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. भारताने हे लक्ष्य १७.२ षटकात ४ विकेट्स गमावून पूर्ण केले आणि दमदार विजय मिळवला.

हेही वाचा : अखेर बांगलादेशी खेळाडू विजयी! BCB कडून एम. नझमुल इस्लामलाची यांची उचलबांगडी; वाचा सविस्तर

कुंडूची दमदार खेळी

अभिज्ञान कुंडूने शानदार खेळीने भारताचा विजय सोपं केला. तो जेव्हा क्रीजवर आला तेव्हा  भारताच्या २५ धावांत ३ विकेट गेल्या होत्या.   वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी आणि आयुष म्हात्रे आधीच माघारी गेले होते. त्यानंतर कुंडूने विहान मल्होत्रा ​​आणि कनिष्क चौहानसोबत  भागीदारी रचून भारताला विजय मिळवून दिला. भारताकडून अभिज्ञान कुंडूने सर्वाधिक ४२ धावा केल्या. या खेळीत त्याने ५ चौकार आणि १ षटकार लगावला. त्याने षटकार मारून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. एकूणच भारताची सुरुवात विजयाने झाली.

हेनिल पटेल विजयाचा नायक

अभिज्ञान कुंडूच्या भारताचा वेगवान गोलंदाज हेनिल पटेलने विजयाचा पाया रचला होता. उजव्या हाताच्या या वेगवान गोलंदाजाने अमेरिकन फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याने ७ षटकांत फक्त १६ धावा देत अमेरिकेच्या ५ फलंदाजांना माघारी पाठवले. त्याच्या या कामगिरीमुळे अमेकरिका ३५.२ षटकात १०७ धावांवर गारद  झाला. इथेच भारताचा विजय निश्चित मानला जाऊ लागला होता. १९ वर्षांखालील विश्वचषकात हेनिल पटेलने घेतलेला पाच बळी ही खास कामगिरी ठरली. कारण आठ वर्षांनंतर आयसीसी अंडर-१९ विश्वचषक  स्पर्धेत पहिल्यांदाच भारतीय गोलंदाजाने जी किमया साधली आहे.

हेही वाचा : IND vs NZ T20I Series : मालिकेपूर्वीच भारताला मोठा झटका! ‘हा’ विजयवीर अष्टपैलू खेळाडू स्पर्धेतून बाहेर

दोन्ही संघांसाठी प्लेइंग ११ खालीलप्रमाणे

भारत अंडर U19 प्लेइंग 11: आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी, विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंश पनगालिया, आरएस अम्ब्रिस, कनिष्क चौहान, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन, खिलन पटेल

युनायटेड स्टेट्स U19 प्लेइंग 11: साहिल गर्ग, अमरिंदर गिल, अर्जुन महेश (विकेटकीपर), उत्कर्ष श्रीवास्तव (कर्णधार), ऋत्विक अप्पीडी, अदनीत झांब, अमोघ अरेपल्ली, नितीश सुदिनी, सबरीश प्रसाद, आदित कप्पा, ऋषभ शिं

Web Title: Ind u19 vs usa u19 india defeats usa by 6 wickets in the u19 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 08:28 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.