BCB कडून एम. नझमुल इस्लामलाची यांची उचलबांगडी(फोटो-सोशल मीडिया)
M. Nazmul Islam’s dismissal by BCB : बांगलादेश क्रिकेट संघाकडून मोठी अपडेट आली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे संचालक एम. नझमुल इस्लाम यांना त्यांच्या कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांपासून मुक्त केले गेले आहे. बीसीबीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत बीसीबीने एक निवेदन शेअर करत म्हटले आहे की, “बीसीबी हे कळवू इच्छिते की अलिकडच्या घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर आणि संस्थेच्या हितासाठी, बीसीबी अध्यक्षांनी नझमुल इस्लाम यांना वित्त समितीच्या अध्यक्षपदावरून तात्काळ मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.” या निर्णयामुळे बंगालदेशी खेळाडूंचा विजय झाल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा : India Open 2026 : ‘देशाच्या काही कमतरता…’, इंडिया ओपनच्या आयोजनाबद्दल माजी जागतिक नंबर वन श्रीकांतचे विधान
नझमुल इस्लाम यांना बरखास्त करण्याचा हा निर्णय बीसीबी घटनेच्या कलम ३१ अंतर्गत घेण्यात आला आहे, ज्याचा उद्देश बोर्डाचे सुरळीत आणि प्रभावी कामकाज सुनिश्चित करणे हा आहे. बीसीबी अध्यक्ष पुढील सूचना मिळेपर्यंत वित्त समितीचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहे.
एम. नझमुल इस्लाम हे घेत आलेले विचित्र निर्णय आणि विधाने बांगलादेश क्रिकेटमधील परिस्थितीला बिघडवत आहेत, ज्यामुळे देशातील अव्वल आणि देशांतर्गत खेळाडू यांची मानसिकता बिघडते ते अस्वस्थ होत आहेत. म्हणूनच, खेळाडूंकडून त्यांच्याविरुद्ध मोर्चा उघडण्यात आला होता.
एका वृत्तानुसार, बांगलादेशच्या क्रिकेटर्स वेल्फेअर असोसिएशनकडून एक आपत्कालीन ऑनलाइन पत्रकार परिषद घेण्यात आली. खेळाडूंचे प्रतिनिधी आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू मोहम्मद मिथुन यांनी स्पष्टपणे महतेले आहे की, इस्लामच्या निराधार विधानांनी सर्व मर्यादा पार केल्या होत्या.
एम. नझमुल इस्लाम सातत्याने निराधार विधाने करत आले आहेत, तरी, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे की, जर बांगलादेश संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकात सहभागी झाला नाही तर त्यामुळे बोर्डाचेच नव्हे तर खेळाडूंचेच आर्थिक नुकसान होणार आहे. बोर्ड त्यांना कोणतीही भरपाई देणार नाही. त्यानंतर, बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आले. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचेचा असा विश्वास आहे की हे विधान केवळ अपमानजनकच नाही तर खेळाडूंना नाराज करणारे देखील आहे.






