न्युझीलंडविरुध्दच्या टी20 मालिकेतुन वॉशिंग्टन सुंदर बाहेर(फोटो-सोशल मिडिया)
IND vs NZ, Washington Sundar ruled out of the T20I series : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेनंतर या दोन्ही देशात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वीच भारताला मोठा झटका बसला आहे. भारतीय अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० मालिकेतून बाहेर पडला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका २१ ते ३१ जानेवारी दरम्यान होणार आहे. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी ही मालिका महत्त्वाची मानली जात आहे. ११ जानेवारी वडोदरा येथे खेळवण्यात आलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाली होती. वॉशिंग्टन साईड स्ट्रेनमधून सावरत आहे.
हेही वाचा : अखेर बांगलादेशी खेळाडू विजयी! BCB कडून एम. नझमुल इस्लामलाची यांची उचलबांगडी; वाचा सविस्तर
२१ जानेवारी रोजी नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पहिल्या सामन्याने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. ही मालिका ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आयसीसी T20 विश्वचषकासाठी भारताच्या तयारीचा एक भाग असणार आहे तथापि, विश्वचषकापूर्वी वॉशिंग्टन तंदुरुस्त होईल की नाही याबाबत स्पष्टता नाही. काही वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, वॉशिंग्टन विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. बीसीसीआयने सुंदरच्या दुखापतीचे वर्णन केले आहे की, “डाव्या हाताच्या खालच्या बरगडीत अचानक आलेले दुखणे” असे केले आहे. भारत ७ फेब्रुवारी रोजी विश्वचषकात मुंबईमध्ये अमेरिकेविरुद्ध पहिला सामना खेळाऊन मोहिमेची सुरुवात करणार आहे. निवडकर्त्यांनी एकदिवसीय मालिकेसाठी वॉशिंग्टनऐवजी दिल्लीचा अष्टपैलू आयुष बदोनीची संघात निवड केली आहे. बदोनीला टी२० संघात समाविष्ट करण्यात येईल का? याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
एका वृत्तानुसार, “वडोदरा एकदिवसीय सामन्यातील दुखापतीमधून पूर्णपणे बरे होण्यासाठी वॉशिंग्टनला आणखी काही आठवडे लागणार आहेत. परिणामी, तो न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेला मुकणार आहे. तो टी२० विश्वचषकासाठी तंदुरुस्त असेल की नाही हे सांगणे कठीण आहे.”
सुत्रांनी असे देखील सांगितले आहे की, सुंदर शनिवारी बेंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये हजर होणार आहे. जिथे सविस्तर तपासणीनंतर रिकव्हरीचा कालावधी निश्चित करण्यात येईल.
भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा (पहिल्या तीन सामन्यांसाठी अनुपलब्ध), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), जसप्रीत बुमराह, , रिंकू सिंग, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, इशान किशन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर.






