
Yash Thakur Replaces Harshit Rana
‘ओल्ड इज गोल्ड’! Imran Tahir च्या फिरकीसमोर फलंदाज बेहाल; 47 व्या वर्षी Fifer घेत रचला विश्वविक्रम
भारतीय वेगवान गोलंदाज हर्षित राणा दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेतून बाहेर पडला आहे. हर्षित अफगाणिस्तान मालिकेमधून तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संघातूनही बाहेर झाला आहे. त्याच्या जागी युवा वेगवान गोलंदाज यश ठाकूरचा दोन्ही संघांमध्ये समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने गुरुवार, १० सप्टेंबर रोजी सांगितले की, हर्षित राणा ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये पुनर्वसन उपचार घेत होता आणि त्याच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत होती. मात्र, ७ सप्टेंबर रोजी सामन्याच्या सरावादरम्यान गोलंदाजी करताना राणाला रेक्टस फेमोरिस स्ट्रेन दुखापत झाली आणि तेव्हापासून तो संघाबाहेर आहे.
🚨 News 🚨 Yash Thakur replaces Harshit Rana in India’s T20Is squads for Afghanistan T20Is & Asian Games More Details ▶️ https://t.co/qh86ExSbgB #TeamIndia | #AFGvIND | #AsianGames — BCCI (@BCCI) September 10, 2026
यश ठाकूरबने नुकतेच जुलैमध्ये झिम्बाब्वे दौऱ्यादरम्यान टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने दोन सामन्यात ४ विकेट्स घेतले. ठाकूरचा आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संघातही समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघ या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश करेल, मात्र भारताचा पहिला सामना कोण खेळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यावर नंतर निर्णय घेतला जाईल.
अफगाणिस्तान T20I साठी भारताचा अपडेटेड संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, ईशान किशन, तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, यश ठाकुर.
आशियाई क्रीडा साठी भारताचा अपडेटेड संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिष्णोई, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, वैभव सूर्यवंशी, यश ठाकुर.
Asian Games 2026: जपानमधील हॉटेल्सवरून प्रश्नचिन्ह; टीम इंडिया कुठे राहणार? BCCI ने स्पष्ट सांगितलं