
Asia Cup : भारत-पाक पुन्हा भिडणार, Cricket Fans महासंग्रामाची 'ही' तारीख नोट करून ठेवा
क्रिकेट विश्वात कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत आणि पाकिस्तान सामन्याची आशिया चषकातील (Asia Cup )तारीख समोर आली आहे. एशियन क्रिकेट काउंसिलने (ACC) स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक समोर आणलं असून आता Cricket Fans साठी नोव्हेंबर महिन्यात भारत-पाकिस्तान महासंग्राम पाहण्याची पर्वणीच निर्माण झाली आहे.
Cricket Fans नं पुढील महिना म्हणजेच नोव्हेंबरमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महासंग्राम पाहण्यासाठी सज्ज व्हावे. 19 नोव्हेंबरपासून पुुरुष रायझिंग स्टार एशिया चषकाची सुरुवात होणार आहे. स्पर्धेत आठ संघ भाग घेणार असून यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानची ‘ए’ टीम खेळतील, तर नेपाळ संयुक्त अरब अमिरात (UAE) आणि हाँगकाँगची मुख्य टीम यात भाग घेतील.
कतरची राजधानी दोहामध्ये खेळवण्यात येणाऱ्या एशिया कपचा फायनल सामना 29 नोव्हेंबरला खेळवला जाईल. स्पर्धेची सुरुवात बांगलादेश व हाँगकाँगच्या सामन्याने होणार आहे. 8 संघांना दोन गटांत विभाजन करण्यात आले आहे. ‘अ’ गटात अफगाणिस्तान ‘ए’, बांगलादेश ‘ए’ हाँगकाँग आणि श्रीलंका ‘ए’ यांना ठेवण्यात आले असून ‘ब’ गटात भारत ‘ए’, पाकिस्तान ‘ए’, नेपाळ आणि यूएईचा समावेश आहे.
या स्पर्धेत 22 नोव्हेंबरला भारत आणि पाकिस्तान ‘ए’ संघांमध्ये गट फेरीतील सामना पार पडेल. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. गट फेरीतील हा भारताचा दुसरा सामना असेल. भारत त्याआधी 20 नोव्हेंबरला नेपाळविरुद्ध खेळत मोहिमेची सुरुवात करेल. तसेच पाकिस्तान ‘ए’ टीम 20 नोव्हेंबरलाच यूएईविरुद्ध पहिला सामना खेळेल.
Last edition was a blockbuster and Qatar is ready for another round of fireworks 🧨 𝐓𝐡𝐞 #𝐃𝐏𝐖𝐨𝐫𝐥𝐝𝐌𝐞𝐧𝐬𝐀𝐬𝐢𝐚𝐂𝐮𝐩𝐑𝐢𝐬𝐢𝐧𝐠𝐒𝐭𝐚𝐫𝐬𝟐𝟎𝟐𝟔 𝐫𝐞𝐭𝐮𝐫𝐧𝐬 𝐨𝐧 𝟏𝟗 𝐍𝐨𝐯𝐞𝐦𝐛𝐞𝐫 ⭐ #ACC https://t.co/rCZGF9JCYI — AsianCricketCouncil (@ACCMedia1) October 24, 2026
गटफेरीनंतर नॉकआउटमध्येही भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होताना पाहण्यास मिळेल. दोन्ही गटात अव्वल स्थानी राहणारे संघ सेमिफायनलमध्ये जातील. सेमिफायनल जिंकणाऱ्या संघामध्ये फायनल खेळवली जाईल. जर भारत आणि पाकिस्तान आपल्या गटात अव्वल स्थानी राहिले तर ते सेमिफायनलमध्ये पोहचतील. तसेच येथे विजय मिळवत ते पुन्हा एकदा फायनलमध्ये आमने-सामने उभे ठाकल्याचे पाहण्यास मिळेल.
Jeremy Lalrinnunga : अशी नशिबानं थट्टा मांडली; दुखापतीने रोखली भारताच्या गोल्डन बॉयची भरारी!
2013 पासून सुरू झालेल्या स्पर्धेत भारताने एक वेळाच याचे जेतेपद पटकावले आहे, तर याचे आतापर्यंत 7 हंगाम झालेत. दरम्यान, यावेळी भारतीय संघ दुसरे जेतेपद मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. तसेच बीसीसीआयच्या वतीने अद्याप स्पर्धेसाठी भारत ‘ए’चा संघ घोषित करण्यात आलेला नाही.
Ans: भारत 'ए' आणि पाकिस्तान 'ए' संघांमधील सामना 22 नोव्हेंबरला होणार आहे.
Ans: या स्पर्धेतील सर्व सामने कतारची राजधानी दोहा येथे खेळवण्यात येणार आहेत.
Ans: रायझिंग स्टार्स आशिया चषकाचा अंतिम सामना 29 नोव्हेंबरला होणार आहे.