फोटो सौजन्य – X
भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. पुढील महिन्यात दोन्ही संघांमध्ये २ अनधिकृत कसोटी सामने खेळवले जातील. त्यानंतर ३ अनधिकृत एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. दोन्ही चार दिवसांचे कसोटी सामने लखनौच्या एकाना स्टेडियमवर खेळवले जातील. त्यानंतर कानपूरमधील ग्रीन पार्क येथे एकदिवसीय मालिका होणार आहे. अॅशेस मालिकेसाठी कसोटी संघात स्थान टिकवून ठेवण्याचा सॅम कॉन्स्टसचा मार्ग आता थोडा कठीण झाला आहे.
पुढील महिन्यात होणाऱ्या भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया अ संघात या सलामीवीराची निवड झाली आहे. इंडिया अ विरुद्धच्या दोन प्रथम श्रेणी सामन्यांसाठी निवड झालेला कॉन्स्टस हा एकमेव सध्याचा कसोटी खेळाडू होता. ऑस्ट्रेलियाचे संपूर्ण लक्ष २०२७ च्या सुरुवातीला होणाऱ्या पुढील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दौऱ्यासाठी उदयोन्मुख खेळाडूंना तयार करण्यावर आहे. ऑस्ट्रेलिया अ संघाच्या १४ सदस्यीय चार दिवसीय संघात कूपर कॉनोली, टॉड मर्फी आणि नॅथन मॅकस्विनी यांचा समावेश आहे.
एकदिवसीय सामन्यांसाठी कमी अनुभवी संघाची निवड करण्यात आली आहे. या संघातील पाच खेळाडू २१ वर्षांखालील आहेत आणि एकही खेळाडू २६ वर्षांपेक्षा जास्त वयाचा नाही. बहुतेक रेड बॉल खेळाडू शेफील्ड शिल्ड हंगामाच्या पहिल्या फेरीसाठी मायदेशी परततील. २६ सप्टेंबर रोजी भारत अ विरुद्धचा दुसरा चार दिवसांचा सामना संपल्यानंतर एका आठवड्याने, ४ ऑक्टोबरपासून ही स्पर्धा सुरू होईल.
चार दिवसांचा संघ
झेवियर बार्टलेट, कूपर कॉनोली, जॅक एडवर्ड्स, आरोन हार्डी, कॅम्पबेल केलावे, सॅम कॉन्स्टास, नॅथन मॅकस्वीनी, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, फर्गस ओ’नील, ऑलिव्हर पीक, जोश फिलिप, कोरी रोचिओली, लियाम स्कॉट.
With an eye on the 2027 Border-Gavaskar Trophy, here’s the Australia A squads set to head to India next month: https://t.co/BJX47tv8M8 pic.twitter.com/7ULs4CG6vq
— cricket.com.au (@cricketcomau) August 7, 2025
एकदिवसीय संघ
कूपर कॉनोली, हॅरी डिक्सन, जॅक एडवर्ड्स, सॅम इलियट, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, मॅकेन्झी हार्वे, टॉड मर्फी, तन्वीर संघा, लियाम स्कॉट, लॅची शॉ, टॉम स्ट्रेकर, विल सदरलँड, कॅलम विडलर.