मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त कौशल्य विकास मंत्री श्री.मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून मुंबईत ‘ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभचे’ आयोजन करण्यात आले आहे. दि. १३ ते २२ ऑगस्ट दरम्यान कुर्ला येथे जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मैदानात, मुंबईकरांना पारंपरिक खेळांचा थरार अनुभवण्यास मिळणार आहे. या क्रीडा महाकुंभच्या माध्यमातून लेझिम, फुगडी, लगोरी आणि विटी-दांडूसह शिवकालीन पारंपरिक खेळांना पुनर्वैभव मिळवून देणार असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
Asia Cup 2025 : कोणाच्या हाती असणार आशिया कपमध्ये टीम इंडियाची कमान! हे खेळाडू कॅप्टन्सीच्या शर्यतीत
आधुनिक काळामध्ये जुने खेळ हे काळाच्या ओघांमध्ये पारंपारिक खेळ हे नष्ट होत चालले आहेत. व्हिडिओ गेमिंग या काळामध्ये नव्या पिढीला त्या शिवकालीन मर्दानी खेळांची ओळख करून देणे फार गरजेचे आहे. त्यासाठी आता श्री लोढा यांनी या खेळांचे आयोजन केले होते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी संस्कृतीच्या रक्षणासाठी केलेले योगदान हे देशासाठी फार मौल्यवान होते. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्राचे सुपुत्र आणि ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या नावे हा क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. युवा पिढीस ला पारंपारिक खेळाबद्दल माहिती मिळावी यासाठी कौशल्य विकास मंत्री श्री लोढा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
पारंपरिक खेळाच्या या क्रीडा महाकुंभामध्ये अनेक जुन्या खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कबड्डी, लगोरी, खो खो लेझीम, मल्लखांब, रस्सीखेच, कुस्ती, पंजा लढवणे, पावनखिंड दौड, विटी दांडू, फुगडी, दोरीच्या उड्या त्याचबरोबर योग या क्रीडा प्रकारात महिला आणि पुरुष यांच्यामध्ये गटांचे विभाजन करून या सामन्यांचा आयोजन करण्यात येणार आहे. मुंबई परिसरामध्ये क्रीडा भारतीय संस्थेच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी नोंदणी सुरू करण्यात आले आहे त्याचबरोबर विविध शाळा आयटीआय आणि महाविद्यालयांमध्ये देखील क्रीडा भारतीयांनी संपर्क साधून जास्तीत जास्त विद्यार्थी त्याचबरोबर खेळाडूंना यात सहभागी होण्यास आवाहन केले आहे.
मुंबईमध्ये या आधी देखील लोढा यांनी पारंपारिक खेळांच्या स्पर्धांचे आयोजन केले होते. यादी झालेल्या पारंपरिक क्रीडा स्पर्धांना जनतेने चांगला प्रतिसाद दिला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात खेळाडू सहभागी झाले होते. कुर्ला येथे जाम साहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मैदानामध्ये या स्पर्धेचा आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा महा कुंभामध्ये जनतेने यावर्षी देखील सहभागी व्हावे असे आव्हान विकास मंत्री मंगल प्रभात जोडा यांनी केले आहे. दरम्यान ज्या संस्थांना आणि क्रीडा मंडळांना यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी ९८६७०६६५०६ अथवा ९७६८३२७७४५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन क्रीडा भारतीकडून करण्यात आले आहे.