फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचव्या कसोटीची पहिली इनिंग : सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात भारताच्या संघाने सामन्यात खराब फलंदाजीनतर दमदार कमबॅक केला आहे. भारताचा संघ १८५ धावांवर सर्वबाद झाला होता. आता सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १८१ धावांवर आटोपला. यामुळे भारतीय संघाने पहिल्या डावात ४ धावांची किरकोळ आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणाऱ्या ब्यू वेबस्टरने ५७ धावांचे अर्धशतक झळकावून शो चोरला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ मध्ये भारतासाठी पहिला सामना खेळणारा प्रसिद्ध कृष्णाने टीम इंडियाला खूप प्रभावित केले आहे, ज्यामुळे भारताच्या संघाने ३ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
सिडनी कसोटीत भारतीय संघाचा पहिल्या इनिंगमध्ये १८५ धावांवर मर्यादित होता आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने ९ धावा केल्या होत्या, पण एक विकेटही गमावली होती. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी आपला डाव ९ धावांनी वाढवला, मात्र दिवसाच्या चौथ्या षटकात कर्णधार जसप्रीत बुमराहने केवळ २ धावा केल्यानंतर मार्नस लॅबुशेनला बाद केले. डावाचे १२वे षटक आले तेव्हा मोहम्मद सिराजने त्याच षटकात सॅम कॉन्स्टास आणि ट्रॅव्हिस हेडला बाद केले. कॉन्स्टन्सने २३ धावा केल्या आणि हेड केवळ ४ धावा करून बाद झाला.
Tea on Day 2 in Sydney!
Mohd. Siraj with the final wicket and Australia are all out for 181 in the 1st innings.#TeamIndia with a lead of 4 runs.
Scorecard – https://t.co/NFmndHLfxu#AUSvIND pic.twitter.com/ksQazID2Do
— BCCI (@BCCI) January 4, 2025
ऑस्ट्रेलियाने वेगवान गोलंदाज अष्टपैलू ब्यू वेबस्टरला मालिकेतील अंतिम सामन्यातून वगळले होते. त्याच्या जागी आणखी एक वेगवान गोलंदाज अष्टपैलू ब्यू वेबस्टरला पदार्पणाची संधी मिळाली. १३ षटकांच्या गोलंदाजी स्पेलमध्ये त्याला एकही बळी घेता आला नाही, परंतु फलंदाजीमध्ये त्याने ५७ धावांचे अर्धशतक झळकावून मेहफिल आपल्या नावावर केली. त्याने ५७ धावांच्या खेळीत दमदार फलंदाजी केली आणि 5 चौकारही लगावले. ३९ धावांवर ऑस्ट्रेलियाचे ४ फलंदाज बाद झाले होते, त्या कठीण परिस्थितीत वेबस्टरने स्टीव्ह स्मिथच्या साथीने ५७ धावांची मजबूत आणि महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
सिडनी कसोटीच्या पहिल्या डावात भारताची उत्कृष्ट गोलंदाजी होती. जसप्रीत बुमराहने २ विकेट घेतल्या, पण दुस-या दिवशी लंचनंतर संभाव्य दुखापतीमुळे तो ड्रेसिंग रूममध्ये परतला. ड्रेसिंग रूममध्ये तो ट्रेनिंग किटमध्ये दिसला त्यामुळे बुमराह पुन्हा सामन्यांमध्ये परतला नाही. प्रसिद्ध कृष्णाने ३ विकेट्स नावावर केले तर, मोहम्मद सिराजनेही ३ बळी घेतले. त्याच्यासोबत नितीश कुमार रेड्डीनेही कमालीची कामगिरी करत ज्यांनी कर्णधार पॅट कमिन्सशिवाय मिचेल स्टार्कची विकेटही घेतली. आज दुसऱ्या दिनाच्या सुरुवातीपासूनच भारताच्या संघाचा सामन्यावर दबदबा पाहायला मिळाला त्यामुळे भारताच्या संघाने १८१ धावांवर ऑस्ट्रेलियाला पहिल्या इनिंगमध्ये रोखले.